Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात राडा; अर्चनानं शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या डोळ्यात टाकली हळद, Video Viral
बिग बॉसमधील (Bigg Boss 16 ) एका टास्क दरम्यान अर्चनानं (Archana Gautam) निम्रित (Nimrit Kaur Ahluwalia), एमसी स्टॅन (MC Stan) आणि शिवच्या (Shiv Thakare) डोळ्यात हळद टाकली.
Bigg Boss 16: बिग बॉस 16 (Bigg Boss 16 ) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक वेळा या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होतात. बिग बॉस 16 च्या फिनालेसाठी केवळ 10 दिवस राहिले आहेत. गेल्या आठवड्यात एका टास्क दरम्यान दोन टीममध्ये वाद झाला. या टास्कमध्ये निम्रित कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia), एमसी स्टॅन (MC Stan) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) यांचा एक ग्रुप आणि प्रियंका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary), अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शालीन भनोट (Shalin Bhanot) यांचा दुसरा ग्रुप, असे दोन ग्रुप्स करण्यात आले. या टास्क दरम्यान अर्चनानं निम्रित, एमसी स्टॅन आणि शिवच्या डोळ्यात हळद टाकली.
कसा होता टास्क?
बिग बॉसमध्ये गेल्या एपिसोडमधील टास्क हा दोन टीममध्ये खेळला गेला. एका टीमला दुसऱ्या टीमकडून होणारे टॉर्चर एक तास सहन करायचं होतं, असा हा टास्क होता. या टास्कमध्ये मंडली म्हणजेच निम्रित, एमसी स्टॅन आणि शिव यांच्या टीमला अर्चनाच्या टीमनं टॉर्चर केलं. आगामी एपिसोडमध्ये मंडली म्हणजेच, शिव ठाकरेचा ग्रुप हा अर्चनाच्या ग्रुपचं टॉर्चर करणार आहे.
अर्चनानं निम्रित, एमसी स्टॅन आणि शिवच्या डोळ्यात टाकली हळद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अर्चनानं ही निम्रित, एमसी स्टॅन आणि शिवच्या डोळ्यात हळद टाकत आहे. यावेळी शिव ठाकरेच्या टीमवरती अर्चनाची टीम पाणी देखील टाकते. आता आगामी एपिसोडमध्ये शिव ठाकरेचा ग्रुप हा अर्चनाच्या टीमवर टॉर्चर करणार आहे. आता शिव ठाकरे आणि अर्चना यांच्या टीममध्ये खेळळा गेलेला हा टास्क कोण जिंकेल? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
पाहा प्रोमो :
Promo:#BB16 #BiggBoss #BiggBoss16 pic.twitter.com/EXaT9zIi0X
— 👀 (@daffodil_im) February 1, 2023
बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो. आता वीकेंड का वार मध्ये, या आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर पडतो? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळेल. बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
MC Stan: '80 हजार के जूते' नंतर एमसी स्टॅनच्या टोपीची चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्