Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री!
Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 15 दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) याची घोषणा केली आहे.
![Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री! bigg boss 15 two wild card entry salman khan announces two weeks extension of the show Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/1b719d42ed6bea72a2d8e01350941d6f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. कारण शोच्या निर्मात्यांनी बिग बॉस 15 दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) याची घोषणा केली आहे. यावेळीचा 'वीकेंड का वार' आश्चर्याने भरलेला होता. उमर रियाजच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता सलमान खान आणखी एक मोठी घोषणा केली आहे. हा बिग बॉसचा शेवटचा आठवडा असणार होता पण आता हा शो दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शोचा एक नवीन प्रोमो चॅनलने शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान शो दोन आठवड्यांनी वाढवल्याची घोषणा करताना दिसत आहे. सलमानची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. प्रोमोमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसत आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की फिनालेचे तिकीट जिंकण्याची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यानंतर सलमान खान स्पर्धकांना एक आनंदाची बातमी असल्याचे सांगतो की, हा शो दोन आठवडे वाढवला जात आहे. हे ऐकल्यानंतर राखी सावंत आनंदाने ओरडू लागते, तर निशांत आणि शमिता शेट्टीला धक्का बसताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस 15 शोमध्ये पुन्हा एकदा राजीव अडातिया आणि विशाल कोटियन यांची एंट्री होणार आहे. दोघेही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहेत. पण विशाल आता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. आता विशालऐवजी राजीवसोबत कोणाची एंट्री होते हे पाहावे लागेल.
मीडिया रिपोर्टनुसार, शोचा फिनाले बायो बबलमध्ये होणार आहे. शोचे फक्त काही कर्मचारी या फिनालेचा भाग असतील. उमर रियाझच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता राखी सावंत, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, निशांत भट, तेजस्वी प्रकाश, रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले उरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'
- Sulli Deals : 'बुली बाई'नंतर 'सुली डिल्स' अॅप चर्चेत, जिथे रचला गेला मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याचा पहिला कट
- Pakistan Snowfall : पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 23 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानच्या मंत्र्याचं लज्जास्पद विधान, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)