Shreya Bugde : श्रेया बुगडे करणार बिग बॉसमध्ये एन्ट्री? फोटोमुळे चर्चा रंगल्या
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चैनने अनेकांचे लक्ष वेधले.
श्रेयाने तिचे फोटो शेअर करून त्याला 'मूड' असं कॅप्शन दिले. या फोटोमध्ये श्रेयाच्या गळ्यात एक चैन दिसत आहे. या चैनचे लॉकेट हे बिग बॉसच्या लोगोसारखे आहे. त्यामुळे श्रेया लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर
बिग बॉस हा शो नेहमी चर्चेत असतो. सध्या बिग बॉस-3 ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मराठी बिग बॉसचे सुत्रसंचालन महेश मांजरेकर हे करतात. दर आठवड्याला ते बिग बॉसच्या चावडीवर येऊन स्पर्धकांची शाळा घेतात. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना वेगवेगळे टास्क खेळावे लागतात. तसेच दर आठवड्याला एक स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर होतो. आता श्रेया या शोमध्ये एंट्री करणार का?, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील या अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल