अभिजीत बिचुकले बिग बॉसमध्ये पुन्हा दिसणार नाही? न्यायालयाने जामीन फेटाळला
अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला जामीन मिळाला होता. मात्र खंडणीप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
सातारा : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे त्याची बिग बॉसमध्ये परतण्याची शक्यता कमी झाली आहे.
अभिजीत बिचुकले मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगत न्यायालायाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला जामीन मिळाला होता. मात्र जुन्या खंडणीप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता, मात्र आता तो बिग बॉसच्या घरात पुन्हा दिसेल, याची शक्यता कमी आहे.
कोण आहे अभिजीत बिचुकले?
- साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला - घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय - बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता - पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला - त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन - त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे - आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले - उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली - पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही - यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता - इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं - अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
संबंधित बातम्या