एक्स्प्लोर

Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?

पुन्हा एकदा बिग बॉसचं घर बिचुकलेंच्या आवाजाने आणि शिव्यांनी दणाणलं.

मुंबई : दिलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं तर ते बिग बॉसचं घर कसलं आणि आलेल्या विघ्नात विघ्नसंतोषीपणा नाही केला तर ते बिचुकले कसले. काल पुन्हा एकदा बिग बॉसचं घर बिचुकलेंच्या आवाजाने आणि शिव्यांनी दणाणलं. काल बिग बॉसने घरातील सदस्यांना एक कार्य सोपवलं. त्यात 1 - 10 क्रमांक क्रमाने उभे करण्यात आले होते. आणि ज्या सदस्याला स्वतःसाठी जो क्रमांक योग्य वाटतोय त्याने त्या क्रमांकावर जाऊन उभं रहायचं होतं. आणि आपण या क्रमांकावर का उभे आहोत याचं स्पष्टीकरणही द्यायचं होतं. टास्क सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल त्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. यात बझर वाजण्याआधीच बिचुकले चौथ्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. त्यामुळे रूपालीला सातव्या क्रमांकावर ऊभं राहावं लागलं. आपली योग्यता ही आपल्याला मिळालेल्या क्रमांकापेक्षा जास्त असल्याचं सांगत रुपालीने थेट बिचुकलेंवरच हल्ला चढवला. आत्तापर्यंत बिचुकले कसे वागले, त्यांनी आपल्या टीमला कसं फसवलं, ते कोणाशी किती आणि कसं खोटं बोलले याचा सगळा लेखाजोखाच मांडला. पण बिचुकलेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी रुपालीचे हे सगळे आरोप फेटाळून लावले. आता केलेले आरोप फेटाळणं हे राजकारण्यांसाठी काही नवीन नाही म्हणा. पण बिचुकलेंनी आरोप मान्य करण्यास नकार दिल्यावर रुपालीने त्यांच्या भावनिक बाजूलाच हात घातला आणि त्यांना थेट त्यांच्या मुलीची शपथ घ्यायला लावली. मुलीचं नाव घेतल्यानंतर मात्र बिचुकले चांगलेच बिथरले. ते इतके बिथरले की त्यानंतर ते जे काही बोलले ते पाहताना मूकपट बघितल्याचाच भास झाला. शिव्यांचा प्रचंड भडिमार केल्यामुळे बिचुकल्यांचा आवाज पुन्हा एकदा म्युट करावा लागला. या सगळ्या गडबडीत बिचुकलेंनी आपली चौथ्या क्रमांकावरची जागा सोडली आणि या संधीचा पुरेपुर फायदा घेत रुपालीने ती जागा काबीज केली. या सगळ्या प्रकारानंतर बिचुकले एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी थेट मी हा खेळ सोडतोय. असले फालतू खेळ मला खेळायचे नाहीत असं म्हणत थेट बिग बॉसना त्यांची बॅग भरायला सांगितली आहे. आता शिवानी आणि बिचुकलेंची मैत्री तर सर्वश्रुत आहे. शिवानीला घरातून काढल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख बिचुकलेंना झालं होतं. त्यामुळे असं वागून बिचुकले शिवानीची जागा पुढे चालवणार की शिवानीच्या पावलावर पाऊल ठेवत बिचुकले ही बिग बॉसच्या घराला राम राम करणार हे आता या आठवड्याच्या शेवटी कळेलच.

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

व्हिडीओ

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget