एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : लाथ मारुन वैभवने निक्कीला बाहेर काढलं, फुटबॉल टास्कमधून ग्रुपमधील भांडणं चव्हाट्यावर? 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता एका ग्रुपमध्ये चांगलीच भांडणं सुरु झाली असल्याचं पाहायला मिळतंय. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) चौथ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश देशमुखने स्पर्धकांच्या घरातील वागण्यावर त्यांची कानउघडणी केलीच पण त्यांची शिक्षा देखील सुनावली.  बिग बॉसच्या घरात दिवसागणिक प्रत्येकाची समीकरणं बदलत असतात. तसेच जर एखाद्याला घराबाहेर काढण्याची पॉवर दिली तर ते सदस्य कुणाला घराबाहेर काढतील याविषयी देखील आता खुलासा झाला आहे. 

भाऊच्या धक्क्यावर इर्मजन्सी सिनेमाच्या निमित्ताने कंगना रणौत आणि श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी एक टास्क घरातल्या स्पर्धकांना देण्यात आला होता. घरातल्यांना एका पॉवर खुर्चीत बसवण्यात आलं आणि त्यामध्ये दोन स्पर्धकांची नावं देण्यात आली. यामध्ये एका स्पर्धकाचा फोटो लावून त्याला लाथ मारुन त्या फुटबॉलला घराबाहेर काढायचं असतं. 

वैभवने लाथ मारुन निक्कीला बाहेर काढलं

वैभवला घन:श्याम आणि निक्की असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यावेळी वैभवने निक्कीचा फोटो लावून फुटबॉलला लाथ मारुन तिला घराबाहेर काढलं. त्यावर स्पष्टीकरण देताना वैभवने म्हटल की, निक्कीला सगळ्याच गोष्टी तिच्याभोवती फिरतायत असं वाटतंय. आम्हीही तिच्याचभोवती फिरतोय असंही तिला वाटतंय.  पण तसं काही नाहीये. मला तिच्या काही गोष्टी नाही पटत. पण अरबाजमुळे तिला ते सगळं सांगणं जड जातंय. घन:श्यामचा गेम वीक आहे पण मला वाटतंय तो राहिल म्हणून. निक्की चांगली आहे, पण तिच्या काही गोष्टी खटकतात. 

त्यावर रितेश निक्कीला म्हणतो की, ज्या व्यक्तीला तुम्ही वाचवलत त्यानेच तुम्हाला घराबाहेर काढलं. तेव्हा निक्कीने रितेशला उत्तर दिलं की, मला सर या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी मला काहीतरी वाटतं तर वाटतं. 

ग्रुप A मध्ये पडली उभी फूट 

निक्कीला तिच्या ग्रुपमधील सदस्य तिच्याबद्दल काय म्हणतात हे रितेश भाऊ दाखवतो. त्यानंतर बाहेर येऊन निक्की म्हणते,"ग्रुप A साठी मी टाळ्या वाजवत आहे. त्यांच्यात दम तर नाहीच आहे. हलके लोक आहेत हे.. ग्रुप Aला मी ट्रॉफी उचलू देणार नाही, हा माझा वादा आहे".                           

ही बातमी वाचा : 

Nikki Tamboli : फेक, हलके लोक ह्यांच्यात दमच नाही; कुणालाच मी ट्रॉफी उचलून देणार नाही; स्वत:च्या ग्रुपवर निक्कीने व्यक्त केला राग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget