Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मोठ्या उत्साहात साजरी करणार 'मंगळागौर'; रंगणार विशेष भाग
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला मोहिते मोठ्या उत्साहात मंगळागौर साजरी करताना दिसणार आहे.
![Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मोठ्या उत्साहात साजरी करणार 'मंगळागौर'; रंगणार विशेष भाग Bhagya Dile Tu Mala marathi Serial Ratnamala Mohite will celebrate Mangalgaur with great enthusiasm special episode Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मोठ्या उत्साहात साजरी करणार 'मंगळागौर'; रंगणार विशेष भाग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/16/fcd76c9bfd2bc6917a1182688eae42251660650726145254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेच्या आगामी भागात रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहे. रत्नामाला मोहितेला मंगळागौर खेळताना पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
श्रावण महिना म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय.
'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मंगळागौरीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा मंगळागौर विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे. मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार? काय घडणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत
Bhagya Dile Tu Mala : तन्वी मुंडले आणि विवेक सांगळेची जोडी दिसणार छोट्या पडद्यावर,'भाग्य दिले तू मला' लवकरच येणार नवी मालिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)