एक्स्प्लोर

Asim Riaz Net Worth : 'इतना पैसा हैं की...'; खतरों के खिलाडीमध्ये रोहित शेट्टीला माज दाखवणाऱ्या असीम रियाजची संपत्ती किती?

Khatron Ke Khiladi 14 : असीम रियाजकडे कोट्यवधींची संपत्ती असून आलिशान गाड्यांचं कलेक्शनही आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मुंबई : छोट्या पडद्यावरील ब्लॉकबस्टर ॲक्शन पॅक शो 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 14) च्या नवीन सीझनला सुरुवात झाली आहे. नवीन सीझनच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमात नवीन वाद उफाळून आला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस 13 फेम असीम रियाज (Asim Riaz) हाही या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता, पण आता त्याला यो शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शोमधील एका टास्कदरम्यान असीम रियाजने इतर स्पर्धक, शोचे निर्माते आणि होस्ट रोहित शेट्टी याच्याबरोबर वाद घातला. यानंतर असीम रियाजला शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे. 

असीम रियाजनं दाखवला रोहित शेट्टीला माज

असीम रियाजने एका टास्क वेळी शोच्या मेकर्ससोबत वाद घातला, याशिवाय त्याने इतर स्पर्धकांसह समोर संपत्ती आणि प्रसिद्धीचा माज दाखवत हमरी-तुमरी केली, शिवाय होस्ट रोहित शेट्टी याच्यासोबतही वाद घातला. असीम रियाजने शोमधील इतर स्पर्धकांची लायकी काढत, स्वत:ची संपत्ती आणि प्रसिद्धीचं गुणगान गायलं. यानंतर होस्ट रोहित शेट्टीने त्याला खतरों के खिलाडी शोमधून बाहेर केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by zain imam official (@zainu_lover_64)

पैशाचा माज दाखवणाऱ्या असीमची संपत्ती किती?

खतरों के खिलाडी शोमधील असीम रियाजच्या या वर्तनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी असीमवर चांगलीच टीका केली आहे. याशिवाय छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेता कुशाल टंडन आणि अभिनेत्री आरती सिंह यांनीही असीम रियाजच्या या वर्तनावर टीका केली आहे. असीमने शोमधील इतर स्पर्धकांची खिल्ली उडवत त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन केलं. यानंतर आता असीम रियाज याच्याकडे नेमकी संपत्ती किती आणि त्याच्या कमाईचं नेमकं साधन काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, तर याचं उत्तर येथे जाणून घ्या.

View this post on Instagram
 
A post shared by zain imam official (@zainu_lover_64)

असीम रियाझची नेटवर्थ

असीम रियाझबाबत विविध रिपोर्टसमध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. असीम रियाज महिन्याला 20 लाख रुपये कमावतो, तर वर्षाला 1.5 कोटी रुपये कमावतो, असं सांगितलं जात आहे. असीमची एकूण संपत्ती 40 ते 50 कोटी रुपये आहे. असीम रियाझ याला खरी ओळख 'बिग बॉस 13' मधून मिळाली. याआधी तो 'मैं तेरा हीरो'मध्ये साईड रोलमध्ये दिसला होता. याशिवाय असीम ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो, यासाठी तो चांगली फी आकारतो.

असीम रियाझचे कार कलेक्शन

असीमने 'खतरों के खिलाडी 14'मध्ये म्हणाला की, तो सहा महिन्यांत चार कार बदलतो. असीम रियाजकडे BMW 5 Series M स्पोर्ट्स कार, Audi Q7, Jeep Rubicon, Mahindra Thar आणि एक पांढरी रॉयल एनफिल्ड आहे.

असीम रियाजच्या कमाईचं साधन काय?

असीम रियाज एक मॉडेल आहे. तो मुख्यत: मॉडेलिंग, अभिनय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करतो. त्याच्या मोठ्या फॅन फॉलोइंगमुळे, असीमला यासाठी चांगलं मानधन मिळतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : निक्कीनं कोकण हार्टेड गर्लला रडवलं; काही बाजूनं, तर काही विरोधात; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी हसवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget