एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : निक्कीनं कोकण हार्टेड गर्लला रडवलं; काही बाजूनं, तर काही विरोधात; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी हसवलं

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशनसाठी राडा पाहायला मिळणार आहे. निक्की आणि अंकिता यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

मुंबई : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा "बॉस" बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या शोला दणक्यात सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्याच्या सुरुवातीलाच निक्की तांबोळी जोरदार फॉर्ममध्ये दिसत आहे. निक्कीने आठवड्याच्या सुरुवातीलाच आधी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घातला त्यानंतर आता निक्कीनं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे. पहिल्याच आठवड्याच्या नॉमिनेशनसाठी निक्की आणि अंकिता यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे.

निक्कीनं अंकिताला रडवलं

बिग बॉस मराठीच्या पुढील भागाचा रोमांचक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व स्पर्धक नॉमिनेशनसाठी एकत्र जमल्याचं दिसत आहे. पण, या सर्वात निक्कीपासून दूर राहणं, अंकितासाठी एक नवीन टास्क झाल्याचं दिसून येत आहे. प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक गार्डनमध्ये एका बॉक्स भोवती उभे दिसत आहे. यावेळी निक्की अंकिताला अडवताना दिसत आहे. अंकिता जिथे जाते तिथे निक्की तिच्या समोर जाऊन उभी राहत असल्याचं दिसत आहे. यानंतर अंकिता कंटाळून बाजूला होते आणि सोफ्यावर जाऊन बसते. यावेळी अंकिताला रडू अनावर होतं.

पाहा नवीन प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोवरुन ही नॉमिनेशन प्रक्रिया स्पर्धकांसाठी नवीन डोकेदुखी मात्र, बिग बॉस प्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. एवढं मात्र नक्की. आता बिग बॉस मराठी सीझन 5 च्या पहिल्याच आठवड्यात कोणते स्पर्धक नॉमिनेट होणार हे येणाऱ्या भागातच कळेल. पण, या दरम्यान बिग बॉसच्या घरात किती वाद आणि किती राडे होणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

नवा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही यावर कमेंट करत भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. काही नेटकरी निक्कीच्या पाठीशी असल्याचं दिसत आहे, तर काही नेटकरी कोकण हार्टेड गर्लला पाठिंबा देताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

एकाने कमेंट करत म्हटलं आहे, "कोकणचं पाणी दाखवं अंकिता", "अंकिता तोंड फोड तिचं", दुसऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "निक्कीला तासणारी चिक्की भेटली". आणखी एकाने लिहिलंय,"निक्की सुपारी थुकून बोलायला कधी शिकणार?" आणखी एकाने सल्ला देत म्हटलंय, "रडतेस काय, तिला ढकलून जा बाई". "निक्की रॉक्स, अंकिता शॉक्स", "निक्की फूल इंटरटेनमेंट", अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Bigg Boss Marathi 5 : निक्कीनं कोकण हार्टेड गर्लला रडवलं; काही बाजूनं, तर काही विरोधात; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी हसवलं

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : नॉमिनेशन, नॉमिनेट... गुलिगत धोका सूरज चव्हाणचा गोंधळ; डीपी, पॅडीनं मोठ्या भावाप्रमाणे समजावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan Attack Update : टार्गेट कोण? सैफ की तैमुर?Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget