एक्स्प्लोर

गिरकी घेतली, अश्विनी कोसळली, पडदा पडला, पण...!

पुणे: ख्यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 'नाट्यत्रिविधा' या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्याचवेळी त्यांना रंगमंचावरच मृत्यूने गाठलं. धक्कादायक म्हणजे या नाटकाचा प्रयोग सुरु होता, त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला डान्स करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, अशीच धारणा उपस्थितांची झाली. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या, त्या कायमच्याच. गिरकी घेतली, अश्विनी कोसळली, पडदा पडला, पण...! अश्विनी एकबोटे यांच्या अकस्मात निधनाने सिने-नाट्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली. संपूर्ण सिने-नाट्य क्षेत्र शोकसागरात बुडालं आहे. गिरकी घेतली, अश्विनी कोसळली, पडदा पडला, पण...! अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या 'गणपती बाप्पा माोरया' या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.

महत्त्वाच्या बातम्या

Vishaka Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून विशाखा सुभेदारांनी एक्झिट का घेतली? अखेर सोडलं मौन, कारण सांगताना म्हणाल्या...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून विशाखा सुभेदारांनी एक्झिट का घेतली? अखेर सोडलं मौन, कारण सांगताना म्हणाल्या...
Actress Sara Gurpal: कोण आहे 'ती' प्रसिद्ध अभिनेत्री? जिच्यावर क्रिकेटर्स फिदा? थेट करतात मेसेज, 'बिग बॉस'मध्येही झालेली सहभागी...
कोण आहे 'ती' प्रसिद्ध अभिनेत्री? जिच्यावर क्रिकेटर्स फिदा? थेट करतात मेसेज, 'बिग बॉस'मध्येही झालेली सहभागी...
Onkar Bhojane On Director Milind Kawde Allegations: अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'
अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress Chetana Bhat Viral Video: 'फियाट गाडी माझी म्हणू का...?', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, VIDEO
'फियाट गाडी माझी म्हणू का...?', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, VIDEO

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget