एक्स्प्लोर

Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'

Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: मराठी अभिनेते संजय मोने यांनी 'कोण होणार करोडपती' क्वीझ शो आणि माधुरी दीक्षितचं सूत्रसंचालन याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: सोनी मराठीवर (Sony Marathi) सुरू असलेल्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या प्रसिद्ध क्विझ शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडची (Bollywood News) धकधक गर्ल आणि असंख्य तरुणांच्या गल्यातील ताईत असलेली माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) करत आहे. सध्या शो सुरू असून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील कलाकार शोमध्ये हॉटसीटवर बसण्यासाठी येतात. अनेकांनी तर हॉटसीटवर माधुरीसोबत बसणं म्हणजे, भाग्यच असल्याचंही म्हटलंय. तसेच, अनेक सेलिब्रिटीही माधुरीसोबत हॉटसीटवर बसल्याचे दिसून आले. माधुरीच्या आधी अनेक दिग्गजांनी या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. 

सुरुवातीला जेव्हा 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर मराठीत 'कोण होणार करोडपती'ची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी सचिन खेडकरांनी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर स्वप्नील जोशी व नागराज मंजुळे यांनीही शोचे सूत्रसंचालन केलंय. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानं माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट केल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मराठी अभिनेते संजय मोने (Marathi Actor Sanjay Mone) यांनी 'कोण होणार करोडपती' क्वीझ शो आणि माधुरी दीक्षितचं सूत्रसंचालन याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यावर सध्या नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. 

संजय मोने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणालेत? (Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati)

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनाबाबत मराठी अभिनेते संजय मोने यांनी एक वक्तव्य केलं आहे. संजय मोने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "का कुणास ठाऊक? पण, आज दीक्षित बाईंचा कार्यक्रम बघितला आणि एक जुनी मराठी म्हण आठवली. ती म्हण अशी, "कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी... त्यापेक्षा सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे."

Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...

अभिनेते संजय मोने यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर संजय मोने यांच्या मताशी सहमत असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं आहे. तसेच, अनेकांनी सचिन खेडकरांसोबतच इतर सूत्रसंचालकांचीही नावं सुचवली आहेत. 

संजय मोनेंच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स, कोण काय म्हणालं? 

सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या 'कोण होणार करोडपती' या क्विझ शोचं सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करत आहे. मराठीतलं प्रसिद्ध नाव असलेल्या अभिनेते संजय मोने यांनी फेसबुक पोस्ट करत माधुरीच्या सूत्रसंचालनावर बोट ठेवलं आहे. तसेच, माधुरीच्या सूत्रसंचालनाची तुलना त्यांनी थेट सचिन खेडेकरांशी करुन ते अप्रतिम कार्यक्रम सादर करायचे, असं म्हटलं आहे. अशातच, संजय मोने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊल पाडला आहे. 


Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...

एका नेटकऱ्यानं म्हटलंय की, "हिंदीत नाव केलेली, कोणी मराठी अभिनेत्री घ्यायचीच होती. तर अगदी उर्मिला मातोंडकर जास्त योग्य होती. मराठी माध्यमातील शिक्षणामुळे, तिच्याकडे भाषेची जाण आहे. महत्वाचं म्हणजे अशा ठिकाणी लागणारी उत्स्फूर्तता, नक्कीच अधिक आहे. फक्त उकडीचे मोदक नि वरण भात आवडतो, हा काही मराठीतील कार्यक्रम निभावून नेऊ शकण्याचा निकष ठरू शकत नाही..." 

पुढे एकानं कमेंट केलीय की, "हा उल्लेख जातीय वाटत नाही? बघा हो हल्ली कोणाचा पापड कसा मोडेल हे सांगता येत नाही!!", तर कुणी माधुरीपेक्षा पल्लवी जोशी बेस्ट पर्याय होती, असंही म्हटलंय. तर काहींनी रेणुका शहाणे यांची निवडही योग्य ठरली असती, असंही म्हटलंय.

आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलंय की, "मी फक्त हिंदीच पाहिलाय. आणि बच्चन सरांनी अतिशय वरच्या लेव्हलचा बेंचमार्क सेट करुन दिलेला आहे. मराठी वाचन चांगलं असणारी, भाषा चांगली बोलणारी उर्मिला मातोंडकर अधिक छान वाटली असती असं मला वाटतं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पैशांसाठी 20 वर्षांनी मोठ्या 'ओवरवेट' प्रोड्यूसरसोबत दुसरं लग्न? प्रसिद्ध अभिनेत्रीची लोकांनी उडवली थट्टा, ट्रोल झाल्यानंतर नवऱ्याबाबत म्हणाली...
पैशांसाठी 20 वर्षांनी मोठ्या 'ओवरवेट' प्रोड्यूसरसोबत दुसरं लग्न? प्रसिद्ध अभिनेत्रीची उडवली थट्टा, ट्रोल झाल्यानंतर नवऱ्याबाबत म्हणाली...
Ranbir Kapoor Daughter Raha Bollywood Debut Ramayan Movie: रणबीर-आलियाची लाडकी लेक राहाचा बॉलिवूड डेब्यू, 'रामायण' सिनेमात दिसणार, कोणती भूमिका साकारणार?
रणबीर-आलियाची लाडकी लेक राहाचा बॉलिवूड डेब्यू, 'रामायण' सिनेमात दिसणार, कोणती भूमिका साकारणार?
Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Embed widget