Arti Singh Injured : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीला दुखापत; रुग्णालयात दाखल
Arti Singh : अभिनेत्री आरती सिंहला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![Arti Singh Injured : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीला दुखापत; रुग्णालयात दाखल Arti Singh Injured Bigg Boss 13 fame Arti Singh admitted hospital after injury 6 stitches in hand Arti Singh Injured : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीला दुखापत; रुग्णालयात दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/43c9d9f69dde8d6574f3b05eeab321831682738056861254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arti Singh Injured : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची सर्जरीदेखील यशस्वी झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
आरती सिंह (Arti Singh) म्हणाली,"23 एप्रिलला मी माझ्या मित्रमंडळींसोबत जेवायला गेली होती. त्यावेळी माझ्या हातून एक काचेचा ग्लास पडला आणि ते काचेचे तुकडे माझ्या हातात घुसले. काचेचे तुकडे माझ्या हातात घुसल्याने मी लगेचच डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी मला कळाचं की सात काचेचे तुकडे माझ्या हातात घुसले आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करत ते तुकडे काढले आणि सात टाके घातले".
आरती सिंहने रुग्णालयातील व्हिडीओ केला शेअर (Arti Singh Shared Video)
आरती सिंहने रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आरती आराम करता करता तिची मालिका पाहताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"हा आठवडा खूपच कठीण होता. काचेचे तुकडे माझ्या हातात घुसल्याने माझी सर्जरी पार पडली.
View this post on Instagram
आरती सिहं पुढे म्हणाली,"माझ्या नव्या मालिकेचा पहिला एपिसोड मला रुग्णालयातून पाहावा लागला. आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. माझी मालिका सुरू होताच मला ब्रेक घ्यावा लागला. पण मी वाघीण आहे लवकरच दमदार कमबॅक करेल".
आरती सिंहबद्दल जाणून घ्या (Who Is Arti Singh)
आरती सिंह सध्या 'श्रवनी' या मालिकेचं शूटिंग करत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. विनोदवीर कृष्णा अभिषेकची आरती सिंह बहिण आहे. आरतीने 2007 साली 'मायका' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'बिग बॉस 13'मधील आरती सिंहची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आरतीने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'उतरन','देवों के देव महादेव', कॉमेडी नाइट्स बचाओ' 'संतोषी मॉं' अशा अनेक मालिकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
Arti Singh Photos : आरती सिंहने केलं स्टायलिश साडीत फोटोशूट, दिल्या सिझलिंग पोज!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)