(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Super Dancer: 'सुपर डान्सर-3' च्या मंचावर लहान मुलाला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे निर्माण झाला वाद; अनुराग बासू म्हणाले, “मी याचा बचाव करणार नाही"
Super Dancer: 'सुपर डान्सर-3' च्या मंचावर लहान मुलाला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुपर डान्सर या शोचे परीक्षक अनुराग बासू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Super Dancer: 'सुपर डान्सर-3' (Super Dancer-3) हा प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या मंचावर एका अल्पवयीन मुलाला काही आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सुपर डान्सर या शोवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने (NCPCR) लहान मुलाला कार्यक्रमामध्ये असे प्रश्न विचारल्याबद्दल नोटीस बजावली. आता या संपूर्ण प्रकरणावर सुपर डान्सर या शोचे परीक्षक अनुराग बासू (Anurag Basu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अनुराग बासू?
अनुराग बासु यांनी एका मुलाखतीमध्ये 'सुपर डान्सर-3' (Super Dancer-3) या शोबद्दल सुरु असणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत ते म्हणाले, “मी याचा बचाव करणार नाही कारण मला समजते की, ते पालकांसाठी किती लाजिरवाणे होते. मी स्वतः दोन मुलांचा पिता आहे. सुपर डान्सर हा मुलांचा डान्स रिअॅलिटी शो आहे. मुलं अनेकदा निरागसपणे गोष्टी सांगतात. आम्ही त्यांच्यासोबत तासनतास शूटिंग करतो आणि ते अनेक गोष्टी सांगतात, ज्या कधी कधी कोणाच्याही नियंत्रणात नसतात. मी या गोष्टीची सहमत आहे की, मी संभाषण अशा दिशेने जाऊ नये, की मुलाने अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्याच्या पालकांना लाज वाटेल.'
NCPCR चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी ANI ला सांगितलं, आम्हाला 'जेम्स ऑफ बॉलीवूड' या ग्रुपकडून तक्रार आली की, सुपर डान्सर 3 नावाचा शो आहे ज्यामध्ये लहान मुलांशी गैरवर्तन केले जात आहे. आम्ही या समस्येचे परीक्षण केले. त्यामध्ये असे आढळले की मुलांना अयोग्य प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना त्यांच्या पालकांसमोर विचित्र परिस्थितीत टाकले जात आहे.NCPCR ने मुलांसाठी मनोरंजन उद्योगात तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन आहे. आम्ही संबंधित चॅनल आणि डीएम यांना या प्रकरणावर कार्यवाही करण्यासाठी पत्र लिहिले आहे.'
#WATCH | Delhi | "We received a complaint from an activist group, 'Gems of Bollywood' that there's a show named Super Dancer 3 on Sony TV in which kids are being ill-treated. We examined the issue and found out that kids are being asked inappropriate questions and they are being… pic.twitter.com/aq5PBlXLz5
— ANI (@ANI) July 26, 2023
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Anupam Kher Latest Video: अनुराग बासुने अनुपम खेर यांच्यासाठी बनवला 'अंडा डोसा'; व्हिडीओ व्हायरल