Anupamaa Spoiler: गुरुमा डिंपल आणि समरला देणार खास गिफ्ट; 'अनुपमा' मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये काय घडणार? जाणून घ्या
Anupamaa Spoiler: अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्येही भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे.
Anupamaa Spoiler: अनुपमा (Anupamaa) मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, डिंपल आणि समर यांच्या लग्नाचे विधी शाह हाऊसमध्ये पार पडले. गेल्या एपिसोडमध्ये डिंपलची खरी आई तिचे कन्यादान करते, हे दाखवण्यात आले होते. यानंतर मालिकेत गुरूमाची देखील एन्ट्री होते. अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्येही भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊयात अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवण्यात येणार आहे.
पायाला खिळा लागण्यापासून अनुज हा गुरुमा मालती देवी यांना वाचवतो. यासाठी अनुपमा अनुजचे आभार मानते. गुरुमा या अनुजला आशीर्वाद देतात. यानंतर अनुपमा गुरुमा आणि नकुल यांची सर्वांशी ओळख करून देते. यावेळी हसमुख म्हणेल की समर आणि डिंपलला आशीर्वाद देण्यासाठी गुरुमा स्वत: आली हा एक सन्मान आहे.
अनुपमा (Anupamaa) ही समर आणि डिंपलला गुरुमा यांचा आशीर्वाद घेण्यास सांगते. गुरुमा या डिंपल आणि समर यांना आशीर्वाद देतात आणि स्वतःच्या हातांनी शिवलेले कापड भेट म्हणून देतात. अनुपमा सांगते की, गुरुमा यांनी स्वतः त्या कापडावर भरतकाम केले आहे.
लीला पुन्हा गुरुमाला चिडवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. ती गुरुमा यांना म्हणेल की, तुम्हाला भेटल्यानंतर अनुपमा ही ठराविक वेळी घरी येत नाही. गुरुमा त्यांचे शब्द शांतपणे ऐकतात आणि सांगतात की, कोणत्याही साधनासाठी वेळ देणे आवश्यक आहे. यानंतर गुरुमा अनुपमाची स्तुती करू लागतात. त्यानंतर गुरुमाने घोषणा करतात की त्या अनुपमाला त्यांच्या अमेरिकेतील गुरुकुलच्या उत्तराधिकारी बनवत आहेत. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते.
View this post on Instagram
अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अनुपमा या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Anupamaa Spoiler: डिंपलच्या आईनं केलं अनुपमाचं कौतुक; 'अनुपमा' मालिका रंजक वळणावर!