Anupama : 'या' कारणामुळे डिंपी भडकली; अनुपमा मालिकेत येणार ट्वीस्ट?
अनुपमा (Anupamaa) या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, लहान रुम मिळाल्यानं डिंपी ही तिच्या वहिनीवर चिडली आहे.
Anupama : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी डिंपी आणि समर यांचा विवाह सोहळा पार पडला आहे, असं दाखवण्यात आलं. आता डिंपी आणि समर यांना लहान रुम मिळाल्यानं डिंपी चिडली आहे. सध्या अनुपमा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, लहान रुम मिळाल्यानं डिंपी ही तिच्या वहिनीवर चिडली आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, डिंपी ही तिच्या वहिनीला म्हणते, "तुम्ही घरातील सगळ्यात लहान रुम मला आणि समरला दिली आहे, त्यात पण आम्हाला एकत्र राहण्याची परवानगी नाहीये?". डिंपीची वहिनी तिला सांगते, "जर मी या विषयावर चर्चा केली, तर हा विषय आणखी मोठा होईल.", यावर डिंपी म्हणते, "वहिनी, छोटी अनुपमा होणं ही तुमची चॉइस आहे आणि डिंपी होणं ही माझी चॉइस आहे.'
पुढे प्रोमोमध्ये दिसते, कांता या अनुपमाला म्हणतात, 'शाह कुटुंबाची सवय आहे, ते तुला सारखा फोन करणार, त्रास देणार पण तुझा आनंद तू त्यांच्यासाठी खराब होऊ देऊ नकोस' कांता यांच्या या बोलण्याचा अनुपमावर काय परिणाम होतो? हे अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
'अनुपमा' या मालिकेचा प्रीमियर 13 जुलै 2020 रोजी झाला होता. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमेश कालरा हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.
अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Anupama : डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ; वनराज सर्वांना देणार काव्याची गुड न्यूज