Anupama : डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ; वनराज सर्वांना देणार काव्याची गुड न्यूज
Anupama Serial : 'अनुपमा' मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असणार आहे.
Anupama Upcoming Episode Spoiler : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांची 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत नुकतच डिंपल आणि समरचा लग्नसोहळा पार पडला असून आता शाह हाऊसमध्ये प्रवेश करण्यास डिंपल सज्ज आहे.
समर आणि डिंपलचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे. आता या लग्नसोहळ्यानंतर 'अनुपमा' मालिकेत नवं वळण येणार आहे. नुकतचं या मालिकेत समर आणि डिंपलच्या लग्नसोहळ्यानिमित्त कुमार सानूची एन्ट्री झाली आहे. तिच्या गाण्यांवर अनुपमा आणि अनुज थिकरताना दिसले होते. तर दुसरीकडे गुरु मा अनुपमाला समजावताना दिसली होती.
View this post on Instagram
अनुपमाला अनुजविरोधात भडकावणार गुरु मा (Anupama Serial Latest Episode)
'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात गुरु मा अनुपमाला अनुजविरोधात भडकावताना दिसणार आहे. तू भरारी घेत असताना अनुज तुझ्या मार्गात यायला नको, असं ती अनुपमाला सांगणार आहे. तर दुसरीकडे अनुपमा गुरु माला सांगणार आहे की, अनुजने प्रत्येकवेळी तिला मदत केली आहे.
अनुजची बोलती बंद करणार गुरु मा
'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात पाठवणीदरम्यान डिंपल अनुजला घट्ट मिठी मारुन रडताना दिसणार आहे. तसेच तो अनुपमाला डिंपलकडे लक्ष द्यायला सांगणार आहे. त्यानंतर गुरु मा त्याची बोलती बंद करत सांगणार आहे की,"तू विसरला असशील तर अनुपमा अमेरिकेला जात आहे. आता तो डिंपलची पाठवणी करत आहेस आणि नंतर अनुपमाची करणार आहेस".
डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ
डिंपलच्या लग्नानंतर 'अनुपमा' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये नवं वादळ येणार आहे. शाह हाऊसमधील सर्वांना ती हैराण करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे काव्या तिच्या घरी जात असताना वनराज तिला थांबवणार आहे आणि घरातील सर्वांना ती आई होणार असल्याची बातमी सांगणार आहे.
संबंधित बातम्या