Rupali Ganguly : रुपाली गांगुलीने ठोकला 50 कोटींचा मानहानीचा दावा अन् सावत्र मुलीने सोडलं मौन; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Esha Verma Breaks Silence On Rupali Ganguly : अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानहानीची नोटिस पाठवल्यानंतर तिची सावत्र मुलगी ईशा वर्माने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Rupali Ganguly Notice To Step Daughter Esha Verma : 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली अलिकडे चर्चेत आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुलीवर तिच्या सावत्र मुलीने गंभीर आरोप केले होते. यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्मावर 50 कोटींची मानहानीही नोटीस धाडली आहे. रुपाली गांगुलीने या प्रकरणी कोर्टात धाव घेत मानहानीची नोटीस बजावल्यानंतर आता ईशा वर्माने मौन सोडलं आहे. रुपाली गांगुलीची सावत्र मुलगी ईशा वर्माने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली गांगुलीने ठोकला 50 कोटींचा मानहानीचा दावा
अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्माला मानहानीची नोटीस पाठवली होती. आता ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणावर मौन सोडलं आहे. ईशाने सांगितलं आहे की, ती आता या सगळ्यापासून खूप पुढे गेली आहे आणि ती अमेरिकेत असून सुरक्षित आहे. ईशा वर्माने सावत्र आई अभिनेत्री रुपाली गांगुलीवर वडिलांना ड्रग्स दिल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने या प्रकरणी कोर्टात धाव घेत, तिला मानहानीची नोटीस बजावली.
रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीने सोडलं मौन
रुपाली गांगुलीने 50 कोटींची मानहानीची नोटीस बजावल्यानंतर सावत्र मुलगी ईशा वर्माने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील तिच्या पोस्ट डिलिट करत स्वत:चं अकाऊंट प्रायव्हेट केलं होतं. आता मानहानीची नोटीस मिळाल्यानंतर ईशाने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ईशाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, "सर्वांना नमस्कार. माझ्यावर दया दाखवल्याबद्दल आणि मला इतका पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणायचं आहे. माझ्यासाठी हेच जग आहे आणि मी फक्त थोडा वेळासाठी प्रायव्हेट राहायचं आहे. आणि मी आता या सर्वातून पुढे जात आहे".
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

ईशाने पुढे म्हटलं आहे की, "आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की, मी अमेरिकेत आहे त्यामुळे इथल्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत आणि आम्ही अधिक संरक्षित आहोत आणि काहीही असो, मला एवढंच सांगायचं आहे की, आम्ही बांधत असलेली ही कम्युनिटी खूप सुंदर आहे आणि मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. मी प्रत्येकाचं प्रोफाईल बघत आहे. तिथून खूप एनर्जी मिळत आहे आणि जर तुम्ही नकारात्मक होणार असाल, तर मी तुम्हाला ब्लॉक करेन किंवा तुम्हाला डिलीट करेन. पण माझ्याकडून सर्वांसाठी खूप प्रेम. तुम्हाला तुमचा खूप अभिमान असायला हवा. तुम्ही अविश्वसनीय आहात!"
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sapna Choudhary Pregnancy : अभिनेत्री सपना चौधरी दुसऱ्यांदा बनली आई! गुपचूप दिला गोंडस बाळाला जन्म, नामकरण सोहळ्यात पहिल्या मुलाचा क्यूट चेहरा समोर
महत्त्वाच्या बातम्या





















