(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष...; बिग बॉस विजेत्या बारामतीकर सूरज चव्हाणचं अजित पवारांकडून कौतुक
Ajit Pawar Reaction on Suraj Chavan : बारामतीकर सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : धूमधडाक्यात सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन अखेर संपला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवर सूरजचं अभिनंदन केलं आहे. अजित पवारांनी सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
सूरज चव्हाणसाठी अजितदादांची खास पोस्ट
अजित पवार यांनी आधीचं ट्वीटर म्हणजेच एक्स मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सुरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
अजित पवार यांची ट्वीटर पोस्ट
आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा… pic.twitter.com/HqX8atrEYV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 6, 2024
सूनेत्रा पवारांकडूनही सूरजचं अभिनंदन
अजित पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही सूरजचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, 'बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकलं! आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धी पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे. सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती, की हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन'.
सुनिता पवार यांची ट्वीटर पोस्ट
बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकले ..!
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) October 6, 2024
आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत… pic.twitter.com/59oVAbPdCw
महत्त्वाच्या इतर बातम्या :