Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेच्या पतीची कॅन्सरशी झुंज, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल
Abhidnya Bhave : अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै (Mehul Pai) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिज्ञा आणि मेहुलचे हॉस्पिटलमधील फोटो समोर आले आहेत.
Abhidnya Bhave : अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै (Mehul Pai) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिज्ञा आणि मेहुलचे हॉस्पिटलमधील फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मेहुलला कॅन्सरसोबत लढण्यात अभिज्ञा खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्याचे चाहते मेहुलला लवकरे बरे वाटावे अशी प्रार्थना करत आहेत.
इंस्टाग्रामवर हॉस्पीटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शन देत त्याने म्हटले आहे की, ''मला आयुष्यात अनेक मूर्ख भेटले मात्र, त्यामधील सर्वात मोठा मूर्ख कर्करोग आहे. माफ कर पण तु चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस.'' या फोटोंमुळे अभिज्ञाचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. अभिज्ञाच्या सहकलाकार आणि मित्रपरिवाराकडून या फोटोंवर अनेक कमेंट आल्या आहेत. त्यांनी मेहुल लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.
अभिज्ञा भावेने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. अभिज्ञाने गेल्या वर्षी मेहुलसोबत प्रेम विवाह केला. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. त्यानेतर हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी 6 जानेवारी 2021 रोजी रेशीमगाठ बांधली.
संबंधित इतर बातम्या :
- Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फॅट टू फिट अवतार, ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
- Garjato Marathi : मराठी भाषा दिनानिमित्त सादर होणार 'गर्जतो मराठी' विशेष कार्यक्रम
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha