Aata Hou De Dhingaana: 'होऊ दे धिंगाणा' चा खास एपिसोड; पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार
आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आणि ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे.
Aata Hou De Dhingaana: स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingaana) कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आणि ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या (Aata Hou De Dhingaana) मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.
माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. आता होऊ दे धिंगाणामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे.
View this post on Instagram
ढोल ताशांच्या गजरात माऊची एण्ट्री होणार आहे. खरतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.मधुराणी प्रभुलकर, रुपाली भोसले, मिलिंद गवळी या कलाकारांनी आई कुठे काय करते या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Big Boss 16 : अर्चना गौतमने साजिद खानवर केला 'हा' आरोप; बिग बॉसनेही सुनावले खडे बोल