Aata Hou De Dhingaana : सिद्धार्थ जाधव पुन्हा घालणार धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा 3 कधीपासून सुरु होणार?
Aata Hou De Dhingaana : 'आता होऊ दे धिंगाणा' शोच्या तिसऱ्या पर्वातून सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा घालणार आहे.
![Aata Hou De Dhingaana : सिद्धार्थ जाधव पुन्हा घालणार धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा 3 कधीपासून सुरु होणार? Aata Hou De Dhingaana 3 will start soon host Sddharth Jadhav will do alot more masti marathi news Aata Hou De Dhingaana : सिद्धार्थ जाधव पुन्हा घालणार धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा 3 कधीपासून सुरु होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/21/b22cb1b024f374381eb1bf128c7325491729493761310322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aata Hou De Dhingaana : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यास सज्ज आहे. 'आता होऊ दे धिंगाणा' शोच्या तिसऱ्या पर्वातून सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा घालणार आहे. तिप्पट धमाल घेऊन 'आता होऊ दे धिंगाणा' या लोकप्रिय टीव्ही शोचं तिसरं पर्व येत आहे. चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आता होऊ दे धिंगाणा' मालिका फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहोचली आहे. स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व 16 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.
सिद्धार्थ जाधव पुन्हा घालणार धिंगाणा
महाराष्ट्राला लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे यंदा धिंगाणा गावामध्ये अर्थात मुक्काम पोस्ट धिंगाणा बुद्रुकमध्ये होणार आहे. धिंगाणाच्या मंचावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी येत असतात. त्यामुळे तिसऱ्या पर्वात धमाल-मस्तीसोबतच महाराष्ट्राच्या मातीतली विविधता नवनव्या टास्कच्या माध्यमातून धिंगाणाच्या मंचावर अनुभवता येणार आहे.
'आता होऊ दे धिंगाणा'चं तिसरं पर्व
मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखिल असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं नवं रुप या पर्वात पाहायला मिळेल. स्टार प्रवाहच्या परिवारातल्या कलाकार मंडळींसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडतील.
तिप्पट धमाल घेऊन येतंय नवं पर्व
अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. आता होऊ दे धिंगाणाने टीआरपीचे नवनवे विक्रम रचले होते. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरु होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. यंदाचा धिंगाणा हा तुमच्या आमच्या गावामध्ये नेणारा असेल. गावच्या चावडीवर बसून एखादा खेळ बघताना जी धमाल येते तीच धमाल हा कार्यक्रम पाहाताना येणार आहे. बरेच नवे टास्क यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणता येईल. म्हणजे यंदाच्या पर्वात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि सोबतीला गावरान ठसकाही आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावा असा आता होऊ दे धिंगाणा 3 असणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग असल्याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे अश्या शब्दात सिद्धार्थ जाधवने आपली भावना व्यक्त केली.
आता होऊ दे धिंगाणा 3 कधीपासून सुरु होणार?
तेव्हा सिद्धार्थ जाधवचा सळसळता उत्साह आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व पाहायलाच हवं. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा 3’ टीव्ही 16 नोव्हेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अभिनेत्याच्या फोनमध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)