(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेत्याच्या फोनमध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप
Khesari Lal Yadav vs Kajal Raghwani : भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादववर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केला आहे. यामुळे त्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.
Khesari Lal Yadav Controversy : भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार खेसारी लाल सध्या अडचणीत सापडला आहे. अभिनेता खेसारी लाल नेहमीच त्याच्या प्रोफोशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत असतो. खेसारी लाल गेल्या काही काळापासून अनेक वादांमध्ये सापडल्याने चर्चत आहे. खेसारी लालचा पवन सिंहसोबतच भांडण आणि काजल राघवानीसोबतचा वाद यामुळे तो बराच काळ चर्चेत होता. आता पवन सिंहसोबतच खेसारी लालचं भांडण मिटलं आहे, मात्र तो दुसऱ्या कारणामुळे पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अभिनेत्री काजल राघवानीने खेसारीवर गंभीर आरोप केले आहेत.
"खेसारी लालच्या फोनमध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ"
अभिनेत्री पलक राघवानी आणि खेसारी लाल यांच्या नात्यात ठिणगी पडताच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. काजलने खेसारी लालबाबत मोठी खुलासा केला आहे. काजल राघवानीने म्हटलं आहे की, खेसारी त्याच्या मोबाईल फोनमध्ये तरुणींचे न्यूज व्हिडीओ आणि फोटो ठेवतो, जे तिने स्वत: पाहिले आहेत. काजलने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत खेसारी लालची पोलखोल करत अनेक दावे केले आहेत.
"त्याच्या फोनमध्ये न्यूड व्हिडीओ आणि फोटो पाहिले"
काजल राघवानीच्या मुलाखतीच्या अनेक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये काजल जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत खेसारी लाल यादवबद्दल बोलत आहे. यासोबत एका व्हिडीओमध्ये काजल सांगतं आहे की, खेसारीच्या फोनमध्ये मुलींचे न्यूड व्हिडीओ आणि फोटो आहेत, जे तिने स्वतः पाहिले आहेत.
खेसारी लालबद्दल काजल रघवानी काय म्हणाली?
काजल रघवानी म्हणाली की, 'मी त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे न्यूड व्हिडीओ आणि फोटोचे स्क्रीनशॉट पाहिले आहेत. तो ज्या मुलीशी बोलायचा, तिच्यासोबत बोलताना स्क्रिनशॉट घ्यायचा आणि ती मुलगी त्याच्यासमोर नग्न असायची. तो असाच आहे, समोर मुलगी नग्न व्हायची आणि तो हसायचा. त्याची टीम आणखी वाईट आहे.' दरम्यान, काजलची ही मुलाखती यूट्यूबवरून हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
पाहा काजल राघवानीचा व्हायरल व्हिडीओ
भोजपुरी एक्टर खेसारी लाल यादव का काला सच बताई काजल राघवानी ने, आप भी हैरान हो जायेंगे यह सुनकर | भोजपुरी इंडस्ट्री में ऐसा भी होता हैं।#BhojpuriIndustry pic.twitter.com/s88qfk61uT
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) October 20, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss 18 च्या स्पर्धकावर 'या' पतीकडून 2.5 कोटी मागितल्याचा आरोप; म्हणाला, 'मुलाला भेटूही देत नाही'