एक्स्प्लोर
प्रिया बापट-उमेश कामतची जोडी आता वेब सीरीजमध्ये एकत्र
'एमएक्स प्लेयर'वर प्रसिद्ध होणार असलेल्या 'आणि काय हवं?' या सीरिजचा प्रोमो नुकताच रिलीज झाला. उमेश आणि प्रिया हे यामध्ये नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबई : चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये एकत्र झळकल्यानंतर मराठी मनोरंजन विश्वातलं लोकप्रिय जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामतची आता वेब सीरीजमध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. 'आणि काय हवं?' या हलक्याफुलक्या वेब सीरीजवर दोघांना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. मुरांबा सिनेमाचा दिग्दर्शक वरुण नार्वेकरने या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलं आहे.
'एमएक्स प्लेयर'वर प्रसिद्ध होणार असलेल्या 'आणि काय हवं?' या सीरिजचा प्रोमो नुकताच रिलीज झाला. उमेश आणि प्रिया हे यामध्ये नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर जुई आणि साकेत यांच्या आयुष्यातल्या गमतीजमती आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. 16 जुलै रोजी ही सीरीज लाँच होईल
उमेश आणि प्रिया यांची जोडी सर्वप्रथम 'शुभम् करोति' या मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर 'नवा गडी नवं राज्य' या नाटकात ते दोघं एकत्र दिसले. लग्नानंतर 'टाईमप्लीज' या सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं होतं. सध्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या प्रियाने प्रोड्युस केलेल्या नाटकात उमेशची मुख्य भूमिका आहे.
'सिटी ऑफ ड्रीम्स' ही प्रिया बापटची वेब सीरिज काही दिवसांपूर्वी चांगलीच गाजली होती. त्यामध्ये प्रियाने दिलेल्या बोल्ड दृश्यांची चर्चाही खूप झाली होती. प्रियासोबत उमेश कामतही आता नव्या माध्यमात दिसणार आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement