एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : अखेर शिक्कामोर्बत झालं! 'आई कुठे काय करते' घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने पोस्ट करत म्हटलं 'मालिकेचा प्रवास...'

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : जवळपास चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच मालिकेचा अंतिम भाग प्रदर्शित केला जाईल. याच मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत ही माहिती दिली. स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम राहणारी ही मालिका होती. पण आता ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. 

आई कुठे काय करते या मालिकेचं कथानक अनेकदा बरीच वळणं घेताना दिसलं. त्यामुळे या मालिकेला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं. संध्याकाळी 7.30 वाजताची वेळ ही या मालिकेची होती. पण त्यानंतर ही वेळ बदलत मालिकेला दुपारचा स्लॉट देण्यात आला. पण आता स्टार प्रवाहवर लवकरच आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका सुरु होणार आहे. दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे लवकरच आई कुठे काय करते ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट काय?

मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'आमची "आई कुठे काय करते" ही स्टारप्रवाह वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2024 हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन...आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात.. लॉकडाऊनच्या काळात स्टारप्रवाहने "आई कुठे काय करते" चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली...ती इतकी भावली की अक्षरश:या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं...'

'आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिलात. आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते "होऊ दे धिंगाणा" किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीतजी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही 45 ते 50 वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोर्टरुम पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये.'  

'असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही.नमिता वर्तक यांची कथा, पटकथा खूप भारी होती. या सिरीयलचे संवाद छान असायचे, प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, बट्टी जमलीच होती आणि विशेष म्हणजे कलाकार...या सिरीयलमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश,इशा,अनघा,विमल, शेखर विशाखा आरोही गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते.मी या सर्वांचा आभारी आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Milind Gawali (@milindgawali)

ही बातमी वाचा : 

Madhugandha Kulkarni : 'तुमचे शब्द मनात घुमत राहतील...', सासऱ्यांच्या निधनानंतर मधुगंधा कुलकर्णीची मन विषण्ण करणारी पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaAbdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशाराRashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमकPriyanka Chaturvedi : सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीवर प्रियंका चतुर्वेदींचं बोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Embed widget