एक्स्प्लोर

Madhugandha Kulkarni : 'तुमचे शब्द मनात घुमत राहतील...', सासऱ्यांच्या निधनानंतर मधुगंधा कुलकर्णीची मन विषण्ण करणारी पोस्ट

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने भावनिक पोस्ट केली आहे.

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी सध्या समोर येत आहे. अभिनेत्री आणि परेश मोकाशी यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णीने (Madhugandha Kulkarni) तिच्या सोशल मीडियावर पोस्ट ही माहिती दिली. पण यावर मधुगंधाने त्यांच्यासाठी लिहिलेल्या शब्दांनी मात्र मन अगदी विषण्ण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. मधुगंधाने वडिलांसारखेच असलेल्या तिच्या सासऱ्यांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

मधुगंधाच्या या पोस्टवर कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. मधुगंधाच्या वडिलांनी ती लहान असतानाच जगाचा निरोप घेतला. पण तिच्या लग्नानंतर तिच्या सासऱ्यांनी आयुष्यातली वडिलांची कमी भरुन काढली अशा भावना मधुगंधाने व्यक्त केल्या आहेत. 

मधुगंधाची पोस्ट

मधुगंधाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझं लग्न होयीपर्यंत माझ्या जिभेला ‘ बाबा ‘ अशी हाक मारायचं वळणाच नव्हतं. माझे बाबा मी अडीच वर्षाची असताना गेले. माझ्या बालपणात , तरुणपणात ती जागा रिक्तच होती.. माझं लग्न झालं आणि बाबा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात... नात्यानं तुम्ही सासरे...पण बापाची माया तुमच्यामुळे कळली मला. आमच्या अफेअर पासून तुम्ही मला मुलगी केलंत आणि परेशला जावई. तुम्हाला सगळ्या गोष्टीत रस आणि सगळ्यामध्ये सपोर्ट करण्याची भावना.. हरिश्चंद्राची फॅक्टरी असो... एलिझाबेथ एकादशी असो ...तुम्ही सदैव पाठीशी उभे राहिलात..तुम्ही नसता तर कदाचित हे चित्रपट झालेही नसते .

पुढे तिने म्हटलं की, तुमचं हसणं लहान मुलासारखं होतं..निरागस ..निर्मळ..किती वाचन , किती ज्ञान ..जगाचा इतिहास असो की भूगोल ..की असो खगोल .सगळ तुम्हाला मुखोद्गत..सगळे धंदे, सगळ्या कलांमध्ये तुम्हाला किती कुतूहल..किती रस...बाबा तुमच्या सारखा स्त्रीवादी, शांत , विवेकी पुण्यवान आणि विरक्त माणूस मी पहिला नाही..तुमचे शब्द मनात घुमत राहतील ...तुमचा लाफ्टर कानात उमटत राहील ..माझा कुणाला त्रास नको...हे ब्रीद वाक्य..झोपल्या झोपल्या वेगळा प्रवास अरंभलात ..तुम्ही तिकडेही असेच शांत, आनंदी आणि विरक्त पोहचले असाल.माझं मात्र मन विषण्ण आहे. बाबा , मी तुम्हाला आयुष्यभर मिस करत राहीन.. 

View this post on Instagram
 
A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)

ही बातमी वाचा : 

Marathi actress : मराठी अभिनेत्रीने केलं होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशाराRashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमकPriyanka Chaturvedi : सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीवर प्रियंका चतुर्वेदींचं बोटABP Majha Headlines :  7 PM :  1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Embed widget