एक्स्प्लोर

Milind Gawali Post : 'मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार' ; अनिरुद्धची आशुतोषसाठी खास पोस्ट 

Milind Gawali Post : अभिनेता ओमकार गोवर्धन हा आई कुठे काय करते या मालिकेमधून ब्रेक घेणार आहे. दरम्यान त्यासाठी अभिनेते मलिंद गवळी यांनी त्याच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. 

Milind Gawali Post : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला आता नवं वळण मिळणार आहे. या मालिकेत आता आशुतोषचा मृत्यू होणार असून अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होईल. त्यामुळे आशुतोषची भूमिका ओमकार गोवर्धन साकारत आहे. पण आता आशुतोष प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यातच मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी त्याच्यासाठी एक खास पोस्ट केलीये. 

आई कुठे काय करते या मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनीही बराच संताप व्यक्त केला. पण त्यावर स्पष्टीकरण देत चॅनल हेड सतीश राजवाडे यांनी मालिका बंद न होण्याचं कारण दिलं. त्यामुळे ही मालिका सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

'ओमकारने या भूमिकेची कात टाकली'

“ओमकार गोवर्धन” याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली !
तीन साडेतीन वर्षांपूर्वी "आईकुठेकायकरते"या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती, अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या आई कुठे काय करते च्या सेटवर जिन्यामध्ये झाली , मी ओमकार ला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत, गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता निळकंठ मास्तर त्या निळकंठ मास्तर च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकर च्या भूमिकेसाठी आई कुठे काय करते मध्ये आला होता , मला त्याला बघून आनंद झाला, कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे, तिचं कास्टिंग कधी चुकत नाही, मी ओमकार ला शुभेच्छा दिल्या, आणि त्याला म्हटलं “वा मजा येणार आता , मला खात्री आहे तू छानच काम करशील !, असं मिलिंद गवळी यांनी म्हटलं. 

'त्या बाबतीत त्याचा हात कुणीच धरु शकणार नाही'

ओमकार ने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला !
मी आणि आप्पा ज्या मेकअप रूम मध्ये होतो त्याच मेकअप रूम मध्येच ओमकार ची सोय करण्यात आली, आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला , humour काय असतं हे ओमकार कडून शिकावं , सतत प्रसन्न राहणे , हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते Director ला विचारून त्याचा निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं,शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं,पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, असंही पुढे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. 

'मी त्याला खूप खूप मिस करेन'

त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची , कधी कधी मेकअप रूम मध्ये आप्पा ,अनीश आणि त्याच्यात्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो,आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे,मला माहितीये मी त्याला खूप खूप miss करणार !जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस feeling आहे,
पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व , त्याची अभिनयाची जाण , आणि त्याचं professionalism , त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे!

ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा देत मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केलीये. 

View this post on Instagram
 
A post shared by Milind Gawali (@milindgawali)

ही बातमी वाचा : 

Siddharth Chandekar : ते आहेत पण कुठेत हेच माहित नाही, म्हणून मी... सिद्धार्थ चांदेकर वडिलांबद्दल झाला व्यक्त 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget