एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : "अजून किती रडत बसणारेस";'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात लेकीला मालिका दाखवत नाही

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला (Madhurani Prabulkar) एक लहान मुलगी आहे.

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सध्या धक्कादायक ट्विस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) अरुंधती हे पात्र साकारत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत आता अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा मृत्यू झालेला दाखवण्यात आलं आहे. या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मालिकेत सतत काही ना ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे अरुंधतीने मालिका आपल्या मुलीला न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अरुंधतीची खऱ्या आयुष्यातील आईदेखील मालिकेच्या कथानकावर नाराज आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेच्या ट्वीस्टवर अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील कुटुंबियांची काय प्रतिक्रिया?

अरुंधतीची खऱ्या आयुष्यातील लेक खूपच लहान आहे. त्यामुळेच बालवयात आपल्या लेकीनी अशी मालिका पाहू नये, असं अरुंधतीला वाटतं. कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मधुराणी म्हणाली,"माझी लेक लहान आहे. त्यामुळे आमच्या घरी टीव्ही जास्त पाहिला जात नाही. लेक जो कंटेट पाहते तो तिच्या वयाचाच बघते. त्यामुळे आमच्या घरी प्रत्यक्ष मालिका लावली जात नाही. पण अधून-मधून माझी आई बघत असते. मालिकेतील प्रत्येक ट्विस्टवर तिचं एक मत असतं. आता हे काय नवीन, असं काय दाखवत आहेत, मग आता तुला किती संकटाचा सामना करावा लागणार, एवढं कशाला दाखवताय, अजून किती रडत बसणारेस, अशा प्रतिक्रिया आई देत असते. 

मालिकेमुळे आईबद्दलचा आदर वाढला : मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर म्हणाली,"आईला आपण खूप गृहित धरत असतो. आपल्यासाठी तिचा जीव सतत तुटत असतो. पण हे आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाढवताना आई तिचं अस्तित्व विसरते. पण या मालिकेच्या माध्यमातून या गोष्टीची जाणीव झाली आहे आणि आईबद्दलचा आदरदेखील वाढला आहे".

अरुंधतीची भूमिका वठवणं किती कठीण? 

अरुंधतीची भूमिका वठवणं हे मधुराणी प्रभुलकरसाठी खूप कठीण आहे. याबद्दल बोलताना मधुराणी म्हणाली,"आम्ही सर्व कलाकार खूप संवेदशनशील असतो. त्यामुळे ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं. स्विच ऑन-स्विच ऑफ करणं खूप कठीण असतं. मालिकेत असा काही ट्वीस्ट येणार हे आम्हालाही माहिती नव्हतं. आम्हा सर्व कलाकारांसाठी हा धक्काच होता. अरुंधतीच्या समोर आता एक नवं चॅलेंज उभं राहिलं आहे. आता ती या परस्थितीचा सामना कशी करणार हे पाहावे लागेल". 

अरुंधतीला येतेय आशुतोषची आठवण

'आई कुठे काय करते' या मालिकेत आशुतोषचं पात्र ओंकार गोवर्धनने साकारलं होतं. आता मालिकेत त्याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. आशुतोषबद्दल बोलताना अरुंधती म्हणाली,"ओंकार एक उत्कृष्ट अभिनेता आहे. व्यक्ती म्हणूनदेखील तो खूप चांगला आहे. ओंकार माझा खूपच चांगला मित्र आहे. शूटिंगदरम्यान आम्ही खूप मजा केली आहे. तो आसपास असताना एक वेगळीच सकारात्मकता यायची. आता आम्हा सर्वांना नक्कीच त्याची आठवण येईल".

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक भडकले; म्हणाले,"आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं, किती नवरे बदलणार?"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget