Aai Kuthe Kay Karte : 'मी असंख्य लोकांच्या शिव्या खातो'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्धची पोस्ट
Aai Kuthe Kay Karte Actor Milind Gawali : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.
Aai Kuthe Kay Karte Actor Milind Gawali : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत अनिरूद्ध ही भूमिका मिलिंद गवळी (Milind Gawali ) हे साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते शेअर करतात. मिलिंद गवळी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला मिलिंद यांनी दिलेल्या कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधले.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
'दुसऱ्याचा विचार न करणारी आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारे काही माणसं असतात, त्यातलाच हा अनिरुद्ध देशमुख. फारच उर्मट, धाकट्या भावाला वाटेल ते बोलणार, त्याच्या मनाला लागेल असं बोलणारा, फक्त चुका दाखवून द्यायच्या, मदत करायची नाही. अनिरुद्धसारखी या आपल्या समाजामध्ये असंख्य माणसं असतात. मी जेव्हा अनिरुद्ध देशमुख ची भूमिका साकारतो, तेव्हा हीच माणसं माझ्या डोळ्यासमोर असतात. मग काय, खातो असंख्य लोकांच्या शिव्या, स्पेशली बायकांच्या. शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो. म्हणजे, असल्या लोकांना मला शिव्या देता आल्या नाहीत, माझ्या वतीने लोक अनिरुद्धला नाही तर त्या लोकांना शिव्या देतात असं वाटतं मला.'
View this post on Instagram
मिलिंद यांची या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संबंधित बातम्या :