Milind Gawali: 'आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये...'; 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नुकतीच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी कॅमेरा आणि फोटो याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. ते या मालिकेमध्ये अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंग हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच त्यांनी कॅमेरा आणि फोटो याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी काही आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात कॅमेरा दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'बहुतेक सगळ्यांनाच आपला फोटो काढून घ्यायची हौऊस असते, मला तरी ती हौऊस खूप आहे! आणि आजकाल मोबाईल मुळे सगळ्यांनाच ते अगदीच शक्य झालं आहे.त्यातही काही माणसं वेगळ्या विचारांची असता, ज्यांना स्वत:ची फोटो काढून घ्यायला अजीबात आवडत नाही. मग अशा लोकांचे मला कँडेड candid फोटो काढायला खूप आवडतं, त्यांचे फोटो त्यांच्या नकळत काढले तर छान येतात.'
मिलिंद यांनी आठवणींना दिला उजाळा
'मी आता-आत्तापर्यंत माझा DSLR कॅमेरा घेऊन फिरायचो, शूटिंगला पण घेऊन जायचो. DSLR ची जी मजा आहे ती मोबाईल फोनमध्ये कधीच येऊ शकत नाही.पण फोटो काढणं सोपं मात्र झालं, पूर्वी कॅमेरा मध्ये कोड्याक Kodak किंवा Fujji चा रोल टाकायला लागायचा आणि मग तो 36 फोटोंचा रोल Lab लॅबमध्ये Develop डेव्हलप करायला द्यायला लागायचा, मग सगळे फोटो एका अल्बम मध्ये लावले जायचे, मोजके फोटो असायचे पण बघायला खूप मजा यायची, आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हजारो फोटो असतात आणि ते एका सेकंदामध्ये जगाच्या कुठल्याही टोकाला असलेल्या कोणालाही सहज पाठवू शकतोय आपण कॅमेरा मध्ये खूप प्रगती झाली टेक्नॉलॉजी वाढली पण त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये जी मजा होती ती कुठेतरी हरवली आहे असं मला वाटतं.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनुरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: