Milind Gawali: 'माझ्या भाग्यात होतं म्हणून...'; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष
मिलिंद (Milind Gawali) हे वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकत्याच एका पोस्टच्या माध्यमातून मिलिंद गवळी यांनी त्यांच्या एका ऑडिशनचा किस्सा सांगितला.
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकत्याच एका पोस्टच्या माध्यमातून मिलिंद गवळी यांनी त्यांच्या एका ऑडिशनचा किस्सा सांगितला.
मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटा साठी श्री माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो,पण ऑडिशन कोणासाठी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरेची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा,पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.'
ऑडिशनमध्ये झाले रिजेक्ट
पुढे मिलिंद यांनी पोस्टमध्ये सांगितलं की त्या ऑडिशनमध्ये ते रिजेक्ट झाले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. रिजेक्शन हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे, कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे.
View this post on Instagram
'एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून 'आई कुठे काय करते' मालिकेमधली अनिरुद्ध देशमुखची भूमिका अजूनही जगतो आहे. नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल.' असंही मिलिंद यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: