Shabaash Mithu Release Date : ठरलं! तापसीचा ‘शाबास मिथू’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
Shabaash Mithu Update : या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Shabaash Mithu Update : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या आगामी 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोबतच चित्रपटाचे नवे पोस्टर देखील रिलीज केले गेले आहे. मितालीचा 8 वर्षांच्या मुलीपासून ते एक स्टार महिला क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
तापसी पन्नूचा ‘शाबास मिथू’ हा चित्रपट येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शाबास मिथू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा पोस्ट :
‘शाबास मिथू’ चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे.
टीझरने वाढवली उत्सुकता!
काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल होता. यात तापसी पन्नू पाठमोरीच दिसली होती. तिच्या टी-शर्टवर 'मिताली 3' असे लिहिले होते. तापसी पन्नूच्या 'शाबास मिथू' या चित्रपटाचा टीझर खूपच प्रेक्षणीय आहे. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच वाढवला आहे. आता सर्वांना तापसीच्या या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. तापसी पन्नूनेही हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याला अभिनेत्रीने छान कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : ‘खूप प्रयत्न केले आई होण्यासाठी, पण...’, कंगनाच्या जेलमध्ये पायल रोहतगीला अश्रू अनावर!
- ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!
- Irrfan Khan Death Anniversary: ‘सलाम बॉम्बे’ ते ‘अंग्रेजी मीडियम’, ‘या’ चित्रपटांमधून कायम लक्षात राहील इरफान खान!