एक्स्प्लोर

'माझ्या मनाला खूप लागलं..; 'झी चित्रगौरव पुरस्कार' सोहळ्यात नक्कल करताच सुरज चव्हाण नाराज, थेट Video पोस्ट करत म्हणाला ..

त्याच्या या व्हिडिओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला सपोर्ट केलाय.  तू ओरीजीनल व्यक्ती आहेस त्यामुळे तुझीच नक्कल होणार, काळजी करू नकोस म्हणत चाहत्यांनी सुरजची समजूत काढलीय.

Suraj chavan: मराठी मनोरंजन सृष्टीतील मानाचा समजला जाणारा 'झी चित्र गौरव पुरस्कार' अलीकडेच मोठ्या थाटात पार पडला. या पुरस्काराला अनेक दिग्गज कलाकार, लेखक दिग्दर्शक आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील नावाजलेले नावं उपस्थित होते. अनेक कलाकारांनी भन्नाट परफॉर्मन्स, स्किट सादर केल्याचे दिसलं. यावेळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाणचीही नक्कल करण्यात आली होती. 'झापुक झुपुक' ,'बुक्कीत टेंगूळ' असे बरेच डायलॉग सादर केले गेले. याचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला. या व्हिडिओनंतर आता सुरज चव्हाणने एक व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सादरीकरण आवडलं पण झी मराठीने मला कार्यक्रमाला बोलावलं नाही असं म्हणत त्याने खंत बोलून दाखवली. 

काय म्हणाला सुरज चव्हाण?

सुरज म्हणाला, 'नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका सुरज चव्हाण. काही कारणाने मी आज व्हिडिओ बनवतोय, कारण माझं मन खूप दुखावलं आहे. कारण झी मराठीवर एक कार्यक्रम झाला. झी चित्र गौरव. या कार्यक्रमात माझी एक्टिंग बघून मला आनंद झाला. पण मला एक खंत आहे. माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली आहे की, एवढा मोठा शो आहे झी चित्र गौरव. त्यांना मला काहीही बोलायचं नाही. ती खूप मोठी लोक आहेत. पण मला त्या कार्यक्रमाच्या कुठलातरी कोपऱ्यात बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं की किमान बोलावलं आहे. त्यांच्याकडून कुठला कॉलही आला नाही. बोलावलंही नाही. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. माझं मन इतकं दुखलं आहे की ते फक्त माझ्या मनाला माहिती. फॅन लोकांनो ,मी तुम्हाला देव मानतो. तुमच्यामुळे मी मोठा स्टार आहे. हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांमुळे झालं आहे. त्यांनी एक नंबर कॅरेक्टर केला आहे सुरज चव्हाणचं.. मलाही आनंद आहे, माझे फॅन पोट धरून हसतात खुदुखुदु.. मला अभिमान आहे. पण मला एक खंत आहे, एकातरी बाजूला मी पाहिजे होतो कुठेतरी. एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही. " असं सुरज म्हणालाय.

तो पुढे म्हणाला, "माझ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगा, त्यांनी मला तिथे बोलवायला पाहिजे होतं की नाही? खरं सांगा माझ्या फॅन लोकांनो.. तुम्ही माझे देव आहात. मी देव म्हणून काळजात ठेवले तुम्हाला. तुमच्यासाठी तरी त्यांनी मला बोलवायला हवं होतं की नाही? असा सवालही त्याने केलाय.

त्याच्या या व्हिडिओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला सपोर्ट केलाय.  तू ओरीजीनल व्यक्ती आहेस त्यामुळे तुझीच नक्कल होणार, काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणत त्यच्या चाहत्यांनी सुरजची समजूत काढलीय.


माझ्या मनाला खूप लागलं..; 'झी चित्रगौरव पुरस्कार' सोहळ्यात नक्कल करताच सुरज चव्हाण नाराज, थेट Video पोस्ट करत म्हणाला .. 

हेही वाचा 

Anushka Shetty: 44 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार 'बाहुबली'फेम अभिनेत्री? कधीकाळी प्रभाससोबत जोडले गेलेलं नाव, आता कोणासोबत थाटणार संसार?

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget