![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Taambdi Chaamdi : जगभरात मराठी गाण्याचा डंका! ब्राउन मुंडेला आव्हान देणारं 'तांबडी चामडी' सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ
Taambdi Chaamdi : जगभरात सध्या मराठी गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळत असून सध्या एक गाणं सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालतंय.
![Taambdi Chaamdi : जगभरात मराठी गाण्याचा डंका! ब्राउन मुंडेला आव्हान देणारं 'तांबडी चामडी' सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ Taambdi Chaamdi Marathi Song challenged to Brown Munde song Viral on Social Media Taambdi Chaamdi : जगभरात मराठी गाण्याचा डंका! ब्राउन मुंडेला आव्हान देणारं 'तांबडी चामडी' सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/03/e1a4baa9460715fb5c25edf12305324f1725359656626720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taambdi Chaamdi : 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi), 'नखरेवाली', 'आप्पाचा विषय लयं हार्ड ए' या मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. अनेक रिल्स या गाण्यावर तयार होत असून सोशल मीडियावर मिलियन्स व्ह्युज या गाण्यांना आले आहेत. त्यातच आता आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याचं चित्र सध्या आहे. ब्राऊन मुंडेलाही आव्हान देणारं 'तांबडी चामडी' (Taambdi Chaamdi) या गाण्यावर सेलिब्रेटींपासून अनेकजण थिरकताना दिसतायंत.
काही वर्षांपूर्वी पंजाबी संगीतकार एपी ढिल्लोंचं ब्राऊन मुंडे हे गाणं सोशल मीडियावर आलं होतं. या गाण्याने जवळपास सगळेच रेकॉड्स तोडले होते. त्यालाच आव्हान देणारं तांबडी चामडी हे मराठी गाणंही आता रसिकांच्या पसंतीस उतरतंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याच गाण्याची चर्चा सुरु आहे.
'या' फौजेने तयार केलं गाणं
तांबडी चामडी हे गाणं श्रेयस सागवेकर याने लिहिलं असून कृणाल घोरपडेने ते संगीतबद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे या दोघांनीही या गाण्याच्या माध्यमातून संगीतसृष्टीतही पदार्पण केल्याचं पाहायला मिळतंय. वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी या गाण्याची निर्मिती केलीये. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे ही मंडळी या गाण्यात झळकताना दिसत आहेत.
ब्राऊन मुंडेनंतर तांबडी चामडी हे गाणं सध्या सगळेच रेकॉर्ड्स तोडत असल्याचं चित्र आहे. इतकच नव्हे तर जगभरात हे गाणं वाजतंय. त्यामुळे मराठी गाण्याचा डंका जगभरात गाजताना दिसतोय.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)