एक्स्प्लोर

'मी आणि शिवानीनं गन फायर केली अन् 10-15 सेकंदांसाठी सुन्न झालो...'; मराठी अभिनेत्याचा शुटिंगवेळीचा 'तो' किस्सा

Swaraj Nagargoje On Tarini Marathi Serial: मी आणि शिवानीने जशी गन फायर केली तसे आम्ही दोघेही 10-15 सेकंदासाठी सुन्न झालो. आम्हाला कळलच नाही कानठळ्या बसल्या, असं अभिनेत्यानं सांगितलं.

Swaraj Nagargoje On Tarini Marathi Serial: 'तारिणी' मालिकेमधून (Tarini Serial) अभिनेता स्वराज नागरगोजे (Swaraj Nagargoje) पहिल्यांदा ऍक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदार ची भूमिका साकारत आहे जो  एक अंडरकव्हर कॉप आहे.  त्याला समाजामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे  ती कमी करायची आहे आणि आपल्या बाबांना शोधायचं आहे. स्वराजने पहिल्या प्रोमोशूट पासून ते शूटिंग पर्यंतचे किस्से शेअर केले आहेत. 

अभिनेता स्वराज नागरगोजे म्हणाला की, "मी आयुष्यात पहिल्यांदा  ऍक्शन सीन केला आहे आणि पहिल्यांदाच गन फायर केली आहे. मला माहिती नव्हतं कि गन फायर करताना इतका मोठ्या प्रमाणात आवाज होतो, मी आणि शिवानीने जशी गन फायर केली तसे आम्ही दोघेही 10-15 सेकंदासाठी सुन्न झालो. आम्हाला कळलच नाही कानठळ्या बसल्या आणि आम्ही दोघे पण हसायला लागलो. तो पहिला प्रोमो शूट करण्याचा अनुभव आणि त्यात पहिल्यांदा ऍक्शन आणि गन फायर करणं एकूण एक खूप छान अनुभव होता."

"तारिणी मालिकेचं जे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे त्यांचा मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. पण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला  ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं आणि  ते  मिस झालं असं जवळपास दोनदा झालं. पण मग मी त्यांना विनंती केली की, घरून बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल का? मला  जशी  ब्रिफींग  मिळाली  होती,  त्यावरुन  मला  जाणवलं  की अंडरकॉप एजंटची भूमिका आहे, तर पर्सनॅलिटी खूप  मॅटर करते, तेव्हा मी  माझ्या  फिटनेसकडे लक्ष दिलं. जेव्हा सिलेक्शनचा कॉल आला तेव्हा माझी  लूकटेस्ट  सुरु  होती आणि  मला  परत  ऑडिशन द्यायची होती. लूकटेस्टनंतर  ऑडिशनसाठी  तयारी  करत होतो, तेवढ्यात झी मराठीमधून शर्मिष्ठा  मॅमना  कॉल  आला  आणि  त्यांनी  सांगितलं की स्वराज  लॉक  झालाय. मला  कळलंच  नाही  की मी  काय रिऍक्ट करू. सगळ्यात आई बाबाना सांगितलं त्यांना  खूप  आनंद  झाला  आणि  माझी  खूप जवळची  मैत्रीण आहे तिला ही कॉल करून सांगितलं. मला इथे सांगावंसं वाटत माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत ते आधीच बोलले होते की, तुझंच सिलेक्शन होणार तू काळजी करू नकोस आणि तसेच झालं...", असं अभिनेता स्वराज नागरगोजेनं सांगितलं. 

"प्रोमोसाठी आम्ही  सगळेच  खूप उत्साही होतो, खास करून  मी  कारण पहिल्यांदा  ऍक्शन सीन शूट केला होता. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी  प्रोमो  एअर  झाला  आणि  लोकांना  खूप  आवडला  मला  माझ्या परिवार आणि मित्रांकडून  खूप  कॉल्स  आले आणि 24 तासांत  प्रोमोला 1 मिलियन्स व्हियूज आले, कंमेंट्समध्ये  लोकांचा उत्साह कळत होता. सेटवर मैत्री तर माझी  शिवानी  बरोबरच झाली आहे. तिनं  मला  विचारले की, किती  एक्ससायटेड  आहेस?  तुझा  लीड म्हणून पहिला  प्रोमो  येतोय  तिथेच आमच्यामध्ये  आईस ब्रेक मोमेन्ट झाली  आणि  मी  थोडा रिलॅक्स  झालो.  माझ्या  भूमिकेचं नाव  केदार आहे, तो  एकटा  राहतो   त्याला  आई  नाहीये,  बाबा  आहेत  पण  बाबा  कोण  आहे?  हे  त्याला  माहिती  नाही, तो  त्यांच्या  शोधात  आहे, कारण ते  त्याला  आणि  त्याचा  आईला  लहान  असतानाच  सोडून  जातात. त्यासोबत त्याच्या लाईफचा एकच गोल आहे समाजामध्ये  जे  क्राईम वाढत आहे  त्याला कमी  करायच आहे.", असं अभिनेता स्वराज नागरगोजे म्हणाला. 

"प्रेक्षकांना  मालिकेबद्दल एकच सांगीन की, खूप  इंटरेस्टिंग  टॉपिक  घेऊन  आम्ही  प्रेक्षकांच्या  भेटीला  येतोय  ज्यामध्ये  त्यांना  फॅमिली  ड्रामा + ऍक्शन असं एकत्र बघयला मिळणार आहे. साधी  सरळ  तारिणी जी  घरी  सगळ्यांना  सांभाळून  घेते  सगळ्यांची   काळजी  करते तीच तारिणी ऑन ड्युटीवर डॅशिंग कमांडींग ऑफिसर  मध्ये ट्रान्सफॉर्म  होताना प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल.", असंही अभिनेता स्वराज नागरगोजे म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ह्रदयी वसंत फुलताना प्रमास रंग यावे, जान्हवी किल्लेकर पुन्हा थिरकली, डान्स VIDEO व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget