शुटींगदरम्यान अपघात, शस्त्रक्रियाही झाली; प्रसिद्ध अभिनेत्याने दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिली वेदनादायी माहिती
Sumedh Mudgalkar : अभिनेता सुमेध मुदगलकरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला झालेल्या गंभीर जखमेविषयी माहिती दिली आहे.
Sumedh Mudgalkar : छोट्या पडद्यावरील राधा-कृष्ण या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी (Sumedh Mudgalkar) एक महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे. सुमेधला शुटींगदरम्यान गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला इजा झाली आहे. सुमेधने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
सुमेधने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे त्याने त्याला झालेल्या दुखापतीविषयीही सांगितलं. सुमेध हा कृष्णाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनीही अगदी भरभरुन प्रेम केलं होतं. पण नुकतीच सुमेधने त्याला दुखापत झाल्याची बातमी सांगितली. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकरच बरे होण्यासाठी त्याचप्रमाणे काळजी घेण्याचाही सल्ला दिलाय.
सुमेधची पोस्ट नेमकी काय?
सुमेधने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, एक अॅक्शन सीनचं शुटींग करत असताना दुर्दैवाने माझ्या नाकाच्या हाडाला दुखापत झाली. नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे मला त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण आता सगळं ठिक आहे. मी अगदी व्यवस्थित आहे. तसेच काळजी करण्याचं काहीही कारण ही. ही फार मोठी दुखापत नव्हती. दुखापत भरुन निघण्यासाठी काही दिवस जातील.
सुमेध मुदगलकरविषयी...
सुमेधचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. तो स्वानंदी बेर्डेसोबत 'मन येड्यागत झालं' या मराठी सिनेमातही झळकला होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती'डान्स इंडिया इंडिया 4' मुळे. त्यानंतर सुमेधच्या डान्सचाही एक चाहतावर्ग तयार झाला. तसेच त्याची कृष्णाची भूमिकाही साऱ्यांना आवडली. सुमेधने 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेत शुशिमची भूमिकाही साकारली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
ही बातमी वाचा :