एक्स्प्लोर

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: अखेर सुदेश म्हशीलकरांनी मौन सोडलं, प्राची पिसाटसोबतच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत म्हणाले...

Sudesh Mhashilkar On Prachi Pisat Viral Screenshort: अभिनेत्री प्राची पिसाटनं स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यानंतर सुदेश म्हशीलकरांना मोठ्या टिकेला सामोरं जावं लागलं. अशातच आता सुदेश म्हशीलकरांनी या प्रकरणावर अखेर मौन सोडलं आहे. 

Sudesh Mhashilkar On Prachi Pisat Viral Screenshort: लोकप्रिय अभिनेत्री (Famous Actress) प्राची पिसाटनं (Prachi Pisat) सोशल मीडियावर (Social Media) एका फेसबुक चॅटचा (Facebook Chat) स्क्रिनशॉर्ट शेअर केला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. तो स्क्रिनशॉर्ट होता, इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी (Sudesh Mhashilkar) प्राचीला केलेल्या मेसेजचा. 'हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीयस...', 'तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय...', असे मेसेजे सुदेश म्हशिलकरांच्या फेसबुक अकाउंटवरुन प्राची पिसाटला करण्यात आले होते. त्यानंतर सुदेश म्हशीलकरांना मोठ्या टिकेला सामोरं जावं लागलं. अशातच आता सुदेश म्हशीलकरांनी या प्रकरणावर अखेर मौन सोडलं आहे. 

सुदेश म्हशीलकरांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. तसेच, प्राचीसोबतच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट सर्वांना दाखवला आहे. तसेच, भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक अकाउंट हॅक झाल्यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच, तक्रारीचा अर्जही सोबत जोडला आहे.   

सुदेश म्हशीलकरांनी फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, "खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sudesh Mhashilkar (@sudeshmhashilkar)

सुदेश म्हशीलकरांनी कोणते मुद्दे मांडले?

1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
 तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.
त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.
आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं 🤣🤣🤣🤣 असं दिसेल.
जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.
पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती.ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो.
माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही.  हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
 माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात.
त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात — आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस.
या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल — तर माझी अजिबात हरकत नाही.

प्रतिष्ठा ही काचेसारखी असते — पारदर्शक, पण नाजूक.
कोणीतरी एक दगड फेकतो… आणि आरसा मोडतो.
आज तो क्षण मी गाठलाय… आणि तो शांतपणे पाहतोय.
वैयक्तिक पातळीवर एवढंच सांगावंसं वाटतं की — जर हे सर्व केवळ बदनामीसाठी केलं जात असेल, तर ते नक्कीच खेदजनकआहे.
 मी हा विषय इथे संपवत आहे.
ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनःपूर्वक आभार.

महत्त्वाच्या बातम्या

Alia Bhatt in Tumbad 2: 'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
'रामायण' येण्यापूर्वी आयोध्येत प्लॉट; आता रणबीर कपूरचा 'मुळशी पॅटर्न'! पुण्यात मोठी गुंतवणूक, किंमत किती माहितीय?
'रामायण' येण्यापूर्वी आयोध्येत प्लॉट; आता रणबीर कपूरचा 'मुळशी पॅटर्न'! पुण्यात मोठी गुंतवणूक, किंमत किती माहितीय?
Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...
Moana Film Review: बेटावर राहणारी 'Moana' दैवी शक्तीच्या शोधात समुद्रात उतरते, वडिलांचा नकार तरीही... 'मोआना' सिनेमा आहे तरी कसा?
बेटावर राहणारी 'Moana' दैवी शक्तीच्या शोधात समुद्रात उतरते, वडिलांचा नकार तरीही... 'मोआना' सिनेमा आहे तरी कसा?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Mahesh Babu Nephew Siddharth Galla Engagement: साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
Embed widget