'ओ अमेय वाघ ..लेकाच्या लग्नाला टांग मारलीत..; सुचित्रा बंदेकरांनी विचारताच सगळेच हसले; अमेय म्हणाला..
त्यांच्या संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. प्रीमियरमध्ये नक्की काय घडलं? जाणून घ्या

Amey Wagh Suchitra Bandekar: काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरच्या लेकाचा नुकताच दणक्यात विवाह सोहळा पार पडला. सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न केलं. या लग्नाची संपूर्ण मनोरंजन विश्वात एकच चर्चा झाली. अनेक सेलिब्रिटींनी या दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. पण काही कलाकारांना लग्नाला येणं जमलं नाही. नुकत्याच एका चित्रपटाच्या प्रीमियरला आदेश आणि सुचित्रा बांदेकरनी हजेरी लावली होती. तिथे सुचित्रा बांदेकरांना अभिनेता अमेय वाघ दिसताच त्यांनी 'ओ अमेय वाघ.. लेकाच्या लग्नाला तुम्ही टांग मारलीत ' असं म्हणताच अमेयनं त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून आदेश बांदेकरांसह सूचित्रा बांदेकरांनाही हसू आवरलं नाही. त्यांच्या संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. प्रीमियरमध्ये नक्की काय घडलं? जाणून घ्या ..
अमेय वाघ दिसताच सूचित्रा म्हणाल्या ..
सध्या मराठी मनोरंजन विश्वात क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची एकच चर्चा आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याच प्रीमियर सोहळ्यात निर्माते व अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर आले होते. सगळ्या कलाकारांशी भेटीगाठी सुरू होत्या. तेवढ्यात सुचित्रा बांदेकरांना अभिनेता अमेय वाघ दिसला. त्याला पाहताच त्या म्हणाल्या,' ओ अमेय वाघ .. लेकाच्या लग्नाला तुम्ही टांग मारलीत .. ' यावर अमेय वाघनं आधी सॉरी सॉरी खूप सॉरी म्हटलं आणि नंतर तो म्हणाला," मी त्याचे व्हिडिओ पाहून त्याला मेसेज केला होता. पण हानिमून वरून आल्या आल्या मी त्यांना भेटायला येणार आहे.' त्याचं उत्तर ऐकून आदेश बांदेकरांसह सुचित्रा बंदेकरांनाही हसू आवरलं नाही. नंतर आदेश आणि सुचित्रा बांदेकरांना बघून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही मागून थोडा नाचत नाचत आला. त्यानं दोघांनाही मिठी मारली. तू येत असताना आदेश बांदेकर म्हणाले," ए हा पण आला नव्हता लग्नाला .. ' त्यानंही जीभ दाताखाली धरली अन सॉरी म्हटलं. नंतर सगळेच फिल्म बघायला एकत्र गेले.
View this post on Instagram
सुचित्रा आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी झिम्मा आणि झिम्मा 2 या दोन्ही चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे दोघांचीही मैत्री पूर्ण केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते. प्रीमियरमध्ये घडलेल्या या मैत्रीपूर्ण आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून गेली आहे. त्यांच्या या संवादाचा व्हिडिओही सोशल माध्यमावर आहे. शिवाय, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची ही सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अमेय वागणे साकारलेला बबन आणि इतर सगळ्यांच्याच भूमिका लक्ष वेधून घेत आहेत.























