Shubhvivah Serial : भूमी - आकाशचं नातं कोणतं नवं वळण घेणार? शुभविवाह मालिकेत नवा ट्विस्ट
Shubhvivah Serial : स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेमध्ये आकाश आणि भूमी यांच्या नात्याला नवं वळण मिळणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर दुपारच्या सत्रातील 'शुभविवाह' (Shubhvivah) या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेचा महाएपिसोड रविवार 11 फेब्रुवारी रोजी दाखवण्यात येणार आहे. भूमीला तिच्या भूतकाळातील काही आठवणींचं विस्मरण होणार आहे. त्यामुळे तिला आकाशसोबतचं नातं देखील आठवणार नाही. तसेच आकाश मात्र त्याच्या आजारपणातून पूर्णपणे बरा झाला आहे. पण या सगळ्यामुळे भूमी आणि आकाशचं नातं कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी मालिकेत आकाशची आत्या रागिणी आणि आकाशचा भाऊ अभिजीत हे दोघे मिळून भूमीला मारण्याचा डाव रचतात. पण त्यावेळी भूमीला वाचवण्यासाठी आकाश हा तिथे पोहचतो. ज्या बोटीवर भूमी आणि आकाश असतात, त्या संपूर्ण बोटीला रागिणी आणि अभिजीत आग लावतात. पण त्यामधून भूमी आणि आकाश वाचतात, मात्र त्यांची ताटातूट होते.
View this post on Instagram
मालिकेला रंजक वळण
मालिकेच्या सुरुवातीपासून आकाशला असलेला आजार बरा करण्यासाठी भूमीची धडपड पाहायला मिळते. पण या अपघातामुळे आकाश पूर्ण बरा झाला असल्याचं पाहायला मिळणार आहे. तसेच भूमी आता तिच्या आयुष्यातले काही क्षण विसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आकाश आणि भूमी यांच्या नात्यामध्ये दुरावा येणार असल्याने मालिका एका रंजक वळणावर पोहचली आहे.
मालिकेत सुरुवातीपासूनच अनेक रंजक गोष्टी घडत होत्या. त्यातच आता भूमी आणि आकाशच्या नात्यावर पुन्हा एकदा परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आकाश आता त्याच्या आजारातून पूर्णपणे बरा झालाय. त्यामुळे आकाशच्या या स्थितीवर रागिणी आत्या आणि अभिजीत काय करमार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच आता यापुढे मालिकेत कोणते नवे ट्वीस्ट येतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं असल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Adah Sharma : अदा शर्माचा हटके एअरपोर्ट लूक, नेसली आजीची 65 वर्षे जुनी साडी