एक्स्प्लोर

Star Pravah Marathi Serial Anandi: घेऊन येतेय सुखाची नांदी… दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा; आजपासून 'आनंदी' प्रेक्षकांच्या भेटीला

Star Pravah Marathi Serial Anandi: मालिकेच्या शीर्षकाला साजेशी अशी आनंदी ही मालिका आजपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Star Pravah Marathi Serial Anandi: जग हे केवळ डोळ्यांनीच पाहता येतं, असं कोण म्हणतं? ते मन आणि स्पर्शातूनही अनुभवता येतं की.. अंध व्यक्ती कायम अंधारात जगणारी असली तरी, त्यांचं जग हे निसर्गाच्या रंगाहून अधिक सुंदर असतं, असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. याच भावनेला स्पर्श करणारी 'आनंदी' (Anandi) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिका कायम समाजात घडत असलेल्या घडामोडींवर आणि वास्तव्याशी जोडलेल्या घटनांवर आधारीत असते.  प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment news) करण्यासह स्टार प्रवाहवरील मालिका उत्तम संदेश देण्याचंही काम करते. मनाला भिडणारी अशीच एक कौटुंबिक आणि अंध - साधी सरळ मुलीची कथा या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.  येत्या 30 मार्चपासून 'आनंदी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

मालिकेच्या शीर्षकानुसार, 'आनंदी' ही तरुणी अंध असली तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असते. तिच्यात जिद्द असते. अंध असली तरी ती सामान्य व्यक्तीप्रमाणे जगात वावरत असते. जन्मत: नाही तर,  अपघातात ती आपली दृष्टी गमावते.   दृष्टी गमावली असली तरीही, हताश न होता जीवनाकडे ती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असते.  डोळ्यांनी तिला जग अनुभवता आलं नसलं तरी ती, आपल्या मनातून, भावनेतून आणि स्पर्शातून हे सुंदर जग अनुभवत असते.  

 'आनंदी' या मालिकेचा फर्स्ट लूक आणि टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या मालिकेच्या टीझरमधून हेच स्पष्ट होते की, 'आनंदी' या तरुणीसाठी अंधत्व हे दुबळेपणा नसून, तिची सर्वात मोठी ताकद आहे. ती स्वत: ला कायम सकारात्मक ठेवते.  गरजूंना मदत करणं, हा तिचा मूळ स्वभाव असल्याचं मालिकेच्या टीझरमधून स्पष्ट होतं.  स्व‍च्छंदी जगणारी आनंदी घरातील जबाबदारीही नेटाने पार पाडते. जे खरंच कौतुकास्पद ठरते. या मालिकेतून अनेकांना प्रेरणाही मिळेल.   

 'आनंदी' या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जाई खांडेकर (jaaee khandekar) साकारत आहे.  ती या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत आहे. पहिलीच मालिकेत अंध तरुणीची भूमिका साकारणं हे खरंच आव्हानात्मक असलं तरीही, अभिनेत्रीने सहजतेने 'आनंदी' ही व्यक्तीरेखा सुंदररित्या साकारलीये. या मालिकेविषयी नवोदित कलाकार जाई म्हणते, 'आनंदी नावाप्रमाणे  स्वभावानेही आनंदी असते.  ही केवळ एक भूमिका नसून, एक भावना आहे.  डोळ्यांनी दिसत नसलं तरी, मनातून, स्पर्शातून ती सगळं अनुभवते. अंध व्यक्ती नेमकं कसं जीवन जगतात, हे दाखवण्यात आलंय.  ही भूमिका साकारणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे'.

'ही भूमिका साकारण्यासाठी मी आठवडाभर अंध मुलांच्या संस्थेत जाऊन वर्कशॉप केलं.  त्या संस्थेतील मुलांच्या दैनंदिन आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  आनंदी ही व्यक्तीरेखा तुम्हाला नक्कीच जवळची वाटेल', असं जाई खांडेकर म्हणाली.

दरम्यान, 'आनंदी' ही मालिका आजपासून स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका आपल्याला  रात्री 9:30 वाजता पाहता येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget