Actor Found Dead In Kerala Hotel: प्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह, अख्खी इंडस्ट्री हादरली
Actor Found Dead In Kerala Hotel: मल्याळम चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करणारे अभिनेते दिलीप शंकर यांचं निधन झालं आहे. केरळमधील एका हॉटेलमधील खोलीत ते मृतावस्थेत आढळून आले. हा मृत्यू कसा झाला आणि याचं कारण काय?, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. एका शोच्या शूटिंगसाठी दिलीप शंकर हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळत आहे.
Malayalam Actor Dileep Shankar Found Dead In Kerala Hotel: मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेते दिलीप शंकर (Dileep Shankar) 29 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या बातमीनं संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. हॉटेलच्या खोलीत दिलीप शंकर यांचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की, नैसर्गिक मृत्यू हे अद्याप समजू शकलेलं नाही. मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमनंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
अभिनेते दिलीप शंकर यांचं निधन झालं आहे. केरळमधील एका हॉटेलमधील खोलीत ते मृतावस्थेत आढळून आले. हा मृत्यू कसा झाला आणि याचं कारण काय?, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. एका शोच्या शूटिंगसाठी दिलीप शंकर हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीत आढळून आला. ते 'पंचगनी' या टीव्ही शोचं शूटिंग करत होते आणि त्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. खोलीतून दुर्गंध येत असल्याचं हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दिलीप यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
हॉटेलच्या खोलीतून बाहेरच पडत नव्हते, दिलीप शंकर
दिलीप शंकर गेल्या काही दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलं नव्हतं. मात्र दिलीप शंकर यांचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळावरून सुसाईड नोटसारखं काहीही मिळालेलं नाही.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
दिलीप शंकर यांच्या अचनाक आणि संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. तर, चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
दिलीप शंकर नेमके कोण?
दिलीप शंकर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं होतं. 'अम्मरियाते' या टीव्ही शोमुळे त्यांना ओळख मिळाली. 'पंचगनी'मध्ये त्यांनी साकारलेल्या चंद्रसेनन या व्यक्तिरेखेचीही खूप प्रशंसा झाली. 'नॉर्थ 24 कथम' आणि चप्पा कुरीशु (Chaappa Kurishu) यांसारख्या मल्याळम चित्रपटांमुळेही त्यांना मोठी पसंती मिळाली.