Guruprasad Death: अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेला मृतदेह, साऊथच्या फेमस दिग्दर्शकाने आयुष्य संपवलं, पैशांच्या तंगीमुळे टोकाचे पाऊल
शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात दुर्गंध येत असल्याचे पाहून पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना त्याचा मृतदेह अपार्टमेंटमधून कुजलेल्या अवस्थेत सापडला.
GuruPrasad Sucide: दक्षिण भारतीय मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'एडेलू मंजुनाथ', 'डायरेक्टर्स स्पेशल' सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे कन्नडचे प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी पंख्याला लटकत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रविवारी 3 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या त्यांच्या अपार्टमेंटमध्ये या दिग्दर्शकाने आत्महत्या करत आयुष्य संपवले. वयाच्या 52 व्या वर्षी पैशाच्या तंगीमुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गुरुप्रसाद यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात दुर्गंध येत असल्याचे पाहून पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना त्याचा मृतदेह अपार्टमेंटमधून कुजलेल्या अवस्थेत सापडला.
पाच-सहा दिवसांपूर्वीच घेतली फाशी
बेंगळुरूच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता गुरुप्रसाद त्यांच्या चित्रपटाच्या कोणत्यातरी गोष्टीला घेऊन अस्वस्थ होते. गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली असणाऱ्या या दिग्दर्शकांन चार-पाच दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. बेंगळुरूच्या अपार्टमेंट मध्ये रविवारी सायंकाळी सडलेल्या अवस्थेत या दिग्दर्शकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. एसीपी सी के बाबा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिग्दर्शक गुरुप्रसाद यांना पाच-सहा दिवसांपूर्वी पाहिले होते.
आर्थिक तंगीमुळे काही दिवसांपासून तणावाखाली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक गुरुप्रसाद हे गेल्या अनेक दिवसांपासून पैशांच्या तंगीमुळे तणावाखाली होते. त्यांच्या अचानक जाण्याने दक्षिण भारतीय मनोरंजनसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 5 ते 6 दिवसांपूर्वीच दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
गुरुप्रसादने दिले हे लोकप्रिय चित्रपट
कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट मनोरंजन सृष्टीला दिले आहेत. त्यांची एडलु मंजुनाथ ही फिल्म लोकांना प्रचंड आवडली. 2006 मध्ये माता या चित्रपटाचा डेब्यू केला. अनेक चित्रपटांची नामांकने आणि पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत.