IMDb वर 9.4 रेटिंग, मल्याळम भाषेतील थ्रिलर सिनेमा; ओटीटीवर उद्या होणार उपलब्ध; कुठे पाहाता येईल?
South Cinema : IMDb वर 9.4 रेटिंग, मळ्यालम भाषेतील थ्रिलर सिनेमा; ओटीटीवर उद्या होणार उपलब्ध; कुठे पाहाता येईल?

South Cinema : सध्या ओटीटीवर दाक्षिणात्य थ्रिलर सिनेमांची (South Cinema) तुफान चर्चा आहे. साऊथचे काही सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट (South Cinema) सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. सध्या हाय रेटिंग मिळवलेला एक चित्रपट (South Cinema) उद्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दोन भाषांमध्ये स्ट्रीम होईल. कोणता आहे हा चित्रपट, चला पाहूया…
सिनेमागृहांप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. दर आठवड्याला होणाऱ्या नव्या रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम असते आणि या आठवड्यातही एक हाय रेटेड चित्रपट रिलीज होत आहे, जो कमी बजेटमध्ये तयार झाला आहे.
IMDb वर 9.4 असा उत्कृष्ट स्कोर मिळवलेला हा चित्रपट म्हणजे ‘मिशा’. ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. ‘मिशा’ चे दिग्दर्शन एम.सी. जोसेफ यांनी केले असून यात कथिर, शाइन टॉम चाको आणि सुधी कोप्पा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. अनोख्या कथानकासाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा केवळ एक सामान्य अॅक्शन थ्रिलर नाही, तर मैत्री, अहंकार, राजकारण आणि वर्गसंघर्ष यांसारख्या गहन विषयांना नवे दृष्टिकोनातून मांडतो. दिग्दर्शकाने मित्रांमधील आदर्श आणि ईर्षा यांसारख्या गुंतागुंतीच्या भावनांचा नात्यांवर होणारा परिणाम एका थरारक कथानकातून प्रभावीपणे दाखवला आहे. सन नेक्स्टने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘मिशा’ हा गहन कथा आणि दमदार अभिनय शोधणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चित्रपट मलयाळम आणि तमिळ भाषेत 12 सप्टेंबर 2025, म्हणजेच उद्यापासून सन नेक्स्टवर पाहता येणार आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























