Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: 'जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरबाबत लेकाचा खळबळजनक खुलासा
Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: अभिनेत्री कुनिका सदानंद चर्चेत असतानाच आता तिचा मुलगा अयान यानं नुकतंच त्याची आई आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड सिंगर कुमार सानू यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: कधीकाळी बॉलिवूड (Bollywood News) गाजवणारी अभिनेत्री सध्या बिग बॉस 19 (Bigg Boss 19) च्या घरात धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री कुनिका सदानंद चर्चेत असतानाच आता तिचा मुलगा अयान यानं नुकतंच तिच्या आईचे आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड सिंगर कुमार सानू (Bollywood singer Kumar Sanu) यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कन्नन (Siddharth Kannan) यांच्या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये बोलताना अयाननं त्याची आई अभिनेत्री कुनिकाच्या अफेअर्सवर भाष्य केलं. तो म्हणाला की, "जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते. त्यापैकी काही चांगले नवरे होते, तर काही चांगले वडील होते." अयानच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझे बॉयफ्रेंड होते..."
अभिनेत्री कुनिका सदानंदचा मुलगा अयान बोलताना म्हणाला की, "मला फार कूल वाटायचं कारण जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचेही बॉयफ्रेंड होते. माझ्या वडिलांसोबत तिचा घटस्फोट झाला होता. पण तिने आमच्यातील अंतर हे असं मिटवलं होतं"
अयाननं या पॉडकास्टमध्ये कुमार सानू आणि कुनिका यांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. अयान म्हणाला की, "कुमार सानू यांना मी कधी भेटलो नाही. पण, त्यांच्या मुलांना मी भेटलो आहे. जानसोबत मी वेळ घालवला आहे. त्याने मला भावासारखं ट्रीट केलं होतं. त्याच्यासोबत माझा फोटोही असेल..."
View this post on Instagram
"मी गुगल सर्च केल्यावर कळलं की, आईचं त्यांच्यासोबत अफेअर आहे"
पुढे अयान म्हणाला, "माझी आई घरात सतत त्यांची गाणी गायची. मी तेव्हा कुमार सानू यांचं नाव गुगल सर्च केलं होतं. जेव्हा मी गुगल सर्च केलं तेव्हा मला कळलं की, ते रिलेशनशिपमध्ये होते. खूप लोक म्हणतात की, त्यांचं 27 वर्षांचं रिलेशन होतं. पण, जर तुम्ही नीट ऐकलं तर कळेल की, माझी आई म्हणते की, ती तेव्हा 27 वर्षांची होती. माझा जन्म ती 35 वर्षांची असताना झाला. ती आजही कुमार सानू यांची गाणी गाते. ती कलाकारावर प्रेम करते. त्याच्या कलेवर प्रेम करते. त्या व्यक्तीवर नाही... मी नंतर आईला कुमार सानू यांच्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा तिनं मला सांगितलं होतं की, ती माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. मी त्यांच्याकडे माझा लाइफ पार्टनर म्हणून बघायचे. असं प्रेम प्रत्येकाला एकदा तरी मिळालं पाहिजे... त्यांचं प्रेम टॉक्झिक होतं..."
"मी त्यांना माझा नवरा मानायचे... : कुनिका सदानंद
सिद्धार्थ कन्ननसोबतच्या जुन्या मुलाखतीत कुनिका सदानंद कुमार सानू यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोललेली. ती म्हणालेली की, "आम्हाला सार्वजनिक ठिकाणी फक्त तेव्हाच एकत्र पाहिलं जायचं, जेव्हा आम्ही शोमध्ये एकत्र परफॉर्म करायचो. मी त्यांनी शोसाठी कुठले कपडे घालावे, हे ठरवायला मदत करायचे. मी त्यांच्या पत्नीसारखी होते आणि त्यांना माझा नवरा मानायचे. हे नातं शकुंतला आणि दुष्यंतसारखे वाटलं. पण नंतर, मला त्यांच्याबद्दल अशा गोष्टी कळल्या ज्यांनी माझा प्रेमभंग झाला..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















