Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीवर चित्रपट येतोय, रणबीर कपूर 'दादा'च्या भूमिकेत
Movie on Sourav Ganguly : एम.एस धोनी, सचिन तेंडुकलर, कपिल देव यांच्यानंतर आता सौरव गांगुली याच्यावर बायोपिक येणार आहे.
Movie on Sourav Ganguly : एम.एस धोनी, सचिन तेंडुकलर, कपिल देव यांच्यानंतर आता सौरव गांगुली याच्यावर बायोपिक येणार आहे. चित्रपटाची कथा तयार असून लवकरच शुटिंगला सुरुवात होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर माजी कर्णधार सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. गांगुलीच्या बायोपिकच्या स्क्रिपटला मंजुरी मिळाली आहे. लवकरच शुटिंगला सुरुवात होणार आहे.
सौरव गांगुली उर्फ दादा याच्या जिवनावर आधारीत चित्रपट येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटात 'दादा'ची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. त्याशिवाय अन्य क्रिकेटपटूंची भूमिका कोण साकारणार? याबाबतची कोणताही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एमएस धोनीवरचं कॅरेक्टरही असेल.
टीम इंडियाला दिला आक्रमकपणा
भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये सौरव गांगुलीचं नाव घेतलं जाते. सौरव गांगुलीच्याच नेतृत्वात टीम इंडिया आक्रमक झाली. गांगुलीनं अनेक युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले. यामध्ये विरेंद्र सहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, हरभजन सिंह, इरफान पठान, एम.एस धोनी यासारख्या खेळाडूंना गांगुलीनं संघात स्थान दिलं होतं. गांगुली आपल्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत होता. सौरव गांगुली आपल्या खेळामुळे जितका प्रसिद्ध होता, तितकाच वादामुळेही चर्चेत राहिलाय. कधी कोचसोबत वाद तर कधी प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत पंगा.... गांगुली नेहमीच चर्चेत राहायचा.
सौरव गांगुलीच्या नावावर 18 हजार पेक्षा जास्त हजार धावा
सौरव गांगुलीनं कर्णधार म्हणून अनेक विक्रम नावावर केलेत. विदेशात टीम इंडिया जिंक शकते, हे गांगुलीच्या विश्वासामुळेच शक्य झालं होतं. त्याशिवाय गांगुली फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं योगदान देत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांगुलीच्या नावावर 18 हजार पेक्षा जास्त धावांची नोंद आहे. त्याशिवाय 38 शतकं आणि 107 अर्धशतके गांगुलीने झळकावली आहेत. त्याशिवाय 132 विकेट्सही घेतल्या आहेत. टेस्ट आणि कसोटीत फलंदाजीची सरासरी 41 पेक्षा जास्त राहिली आहे.
कमबॅक किंग गांगुली
सौरव गांगुलीला त्याच्या कमबॅकमुळे ओळखलं जाते. त्यानं अनेकदा टीम इंडियात कमबॅक केलेय. करिअरच्या अखेरच्या टप्प्यात गांगुली अनेकदा आऊट ऑफ फॉर्म राहिलाय, त्यामुळे संघातील स्थानही गमावावं लागलं होत. पण प्रत्येकवेळा गांगुलीनं तितक्याच वेगानं कमबॅक केलेय. आयपीएलमध्येही अशीच अवस्था होती. त्यामुळे तेव्हा गांगुलीला कमबॅक किंग म्हणून ओळखलं जात होतं.
Ranbir Kapoor will play the role of Sourav Ganguly in his Bio-pic. (Source - RevSportz)
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2023
आणखी वाचा :
Sania Mirza : 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, कसं राहिलं सानियाचं करिअर