एक्स्प्लोर

Soumitra Chatterjee Death : दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, वयाच्या 85 वर्षी अखेरचा श्वास

Soumitra Chatterjee Passes Away : दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते.

Soumitra Chatterjee Passes Away : प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं असून ते 85 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात अॅडमिट होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

सौमित्र चॅटर्जी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. गेल्या 48 तासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. रूग्णालयाने सौमित्र चॅटर्जी यांच्या प्रकृतीसंदर्भात काल एक बुलेटीन जारी केलं होतं. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, 'आम्ही सीटी स्कॅन केलं आहे, जेणेकरून हे माहिती होईल की, नक्की कोणती समस्या आहे. तसेच आम्ही एक ईईजीही केलं होतं. त्यामध्ये समजलं की, त्यांच्या न्युरॉलॉजिकल समस्येत वाढ झाली आहे. तसेच त्यांना ऑक्सिजन घेण्यास त्रास होत आहे.'

डॉक्टरांनी बुलेटीनमध्ये सांगितलं होतं की, पुढिल 24 तास डॉक्टर्स सौमित्र यांच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवणार आहेत. तसेच 'अद्याप त्यांची परिस्थिती नाजूक आहे. परंतु, देवाच्या कृपेने ते कदाचित या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतात.' अशी आशाही डॉक्टरांनी व्यक्त केली होती.

कोण होते सौमित्र चॅटर्जी? 

सौमित्र चॅटर्जी हे बंगाली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. सौमित्र चॅटर्जी यांनी 1959 मध्ये चित्रपट 'अपुर संसार' मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. सौमित्र चॅटर्जी यांनी ऑस्कर विनिंग दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सौमित्र चॅटर्जी यांचा दमदार अभिनयामुळे ते अनेक दिग्दर्शकांचे फेवरेट अभिनेते होते.

सौमित्र चॅटर्जी हे पहिले भारतीय होते, ज्यांना कलाकारांना देण्यात येणाऱ्या फ्रान्सचा सर्वात मोठा पुरस्कार Ordre des Arts et des Lettres ने गौरवण्यात आलं होतं. तसेच दादा साहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड, 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स सोबतच त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsath Full PC : नवनीत राणांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावर संजय शिरसाट काय म्हणाले?Wari Loksabhechi 2024 Chandrapur EP 03 : वारी लोकसभेची चंद्रपुरात, कोण कुणाला धुळ चारणार?ABP Majha Headlines : 5 PM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
रावेरमध्ये शरद पवार गटाचा मोठा नेता बंडाच्या तयारीत, लोकसभा लढवण्यावर ठाम, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही सांगितली!
रावेरमध्ये शरद पवार गटाचा मोठा नेता बंडाच्या तयारीत, लोकसभा लढवण्यावर ठाम, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही सांगितली!
Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
Embed widget