Sonam Kapoor Baby Shower Party : ब्रिटीश-पाकिस्तानी गायक लियो कल्याणकडून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर; म्हणाला...
Leo Kalyan Reacts To Hate Comments : लियो कल्याणनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
![Sonam Kapoor Baby Shower Party : ब्रिटीश-पाकिस्तानी गायक लियो कल्याणकडून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर; म्हणाला... sonam kapoor baby shower leo kalyan who share photo with sonam reacts to hate comments Sonam Kapoor Baby Shower Party : ब्रिटीश-पाकिस्तानी गायक लियो कल्याणकडून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर; म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/6685fe76f7d2897949b0d0cf1334b7b9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Leo Kalyan Reacts To Hate Comments : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं (Anand Ahuja) काही दिवसांपूर्वी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं. या बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमधील एका व्यक्तीनं अनेकांचे लक्ष वेधले. ब्रिटीश-पाकिस्तानी गायक लियो कल्याण (Leo Kalyan) यानं सोनमच्या बेबी शॉवर पार्टीमध्ये हजेरी लावली होती. लियो कल्याणनं या पार्टीमधील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी लियो कल्याणला ट्रोल केलं. या ट्रोलर्सला आता लियोनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
लियो कल्याणनं ट्रोलर्सला दिलं उत्तर
सोनम कपूरच्या बेबी शॉफरमध्ये लियो कल्याणनं ‘मसकली’ आणि ‘चुरा लिया’ ही हिंदी गाणी गाऊन तेथील उपस्थित असलेल्या पाहूण्यांचे मनोरंजन केलं. पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ लियो कल्याणनं सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी लियोला ट्रोल केलं. ट्रोलर्सला उत्तर देत लियोनं एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लियोनं लिहिलं, 'मला वाटतं मी काही तरी चांगलं करत आहे, त्यामुळे लोक मला ट्रोल करत आहेत. ट्रोलर्समुळे मला अजिबात त्रास होत नाही. कारण त्यामधील काही मजेदार कमेंट्स असतात. मी त्या मित्रांसोबत शेअर करतो आणि आम्ही एकत्र खूप हसतो. तर ट्रोलर्स मला नेहमी आठवण करून देतात की मी काहीतरी बरोबर करत आहे. '
View this post on Instagram
लिओनं इंस्टाग्रामवरील त्याच्या बायोमध्ये he/she/they असं लिहून स्वतःचे वर्णन केले आहे. इंस्टाग्रामवर लिओला 87 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. सोनम कपूरसोबत फोटो शेअर केल्यानंतर लिओ चर्चेत होता. सोनमसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये लियोनं ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड ड्रेस असा लूक केलेला दिसत आहेत. तर फोटोमध्ये सोनम ही पिंक ड्रेसमध्ये तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.
हेही वाचा :
बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी असूनही सोनमला करावी लागली ‘वेट्रेस’ची नोकरी! वाचा सोनम कपूरबद्दल...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)