Happy Birthday Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी असूनही सोनमला करावी लागली ‘वेट्रेस’ची नोकरी! वाचा सोनम कपूरबद्दल...
Sonam Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
![Happy Birthday Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी असूनही सोनमला करावी लागली ‘वेट्रेस’ची नोकरी! वाचा सोनम कपूरबद्दल... Happy Birthday Sonam Kapoor know this unknown thing about actress sonam kapoor Happy Birthday Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी असूनही सोनमला करावी लागली ‘वेट्रेस’ची नोकरी! वाचा सोनम कपूरबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/5e4031ea9c890be271972fc13abd238b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sonam Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे. सोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केल्याचा आनंद शेअर केला होता. आज अखेर तो आनंदाचा दिवस आला आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्रीबद्द्लच्या काही खास गोष्टी...
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.
सोनम कपूरने केली नोकरी
पण तुम्हाला माहितीये का, की सोनम कपूरने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी चक्क वेट्रेसचे काम केले आहे. सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. असं असतानाही तिला ही नोकरी करावी लागली होती. सोनम कपूरने हे काम केवळ तिचा पॉकेटमनी वाढवण्यासाठी आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केले होते. जेव्हा सोनम अवघ्या 15 वर्षांची होती, तेव्हा तिने मलेशियातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. या रेस्टॉरंटमध्ये ती वेटर म्हणून काम करायची. पण, सोनम कपूरने 1 आठवड्यातच ही नोकरी सोडली.
वाढलेल्या वजनामुळे उडवली गेली खिल्ली
एक काळ असा होता की, सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये लठ्ठपणामुळे लोक अनेकदा तिची खिल्ली उडवत असत. ज्याचा खुलासा खुद्द सोनमने केला होता. सोनम 15 ते 20 वयात असताना पीसीओओएस आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते. पण, आता स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर अग्रक्रमी आहे.
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन जास्त होते. संजय लीला भन्साळी यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत डेब्यूपूर्वी सोनम कपूरने जवळपास 30 किलो वजन कमी केले होते.
सर्वात महागडी एंगेजमेंट रिंग!
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम कपूरची एंगेजमेंट रिंग सर्वात महागड्या सेलिब्रिटी एंगेजमेंट रिंगपैकी एक आहे. ही अंगठी तिला आनंद आहुजाने भेट दिली होती, ज्याची किंमत सुमारे 90 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
सोनमच्या भावाने बहिणीबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाला..
Sonam Kapoor : सोनमनं सांगितला प्रेग्नन्सी दरम्यानचा अनुभव; म्हणाली, 'हा कठीण प्रवास...'
Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरावर दरोडा, दागिन्यांसह 1.41 कोटींची चोरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)