Sonali Sonawane : सोनाली सोनावणेच्या आवाजाची जादू, चिमुकलीच्या आवाजात गायलेल्या 'बाप्पा नादखुळा' गाण्याची सर्वत्र चर्चा
Sonali Sonawane : एआय टेक्नॉलॉजी नव्हे तर सोनालीने चिमुकलीच्या आवाजात गायलेलं 'बाप्पा नादखुळा' गाणं सध्या व्हायरल होतोय.
Sonali Sonawane : सध्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असल्याचं चित्र आहे. त्यातच आता अशातच चिमुकलीच्या आवाजात गणरायाला घातलेली साद साऱ्यांच्या मनावर राज्य करतेय. 'नखरेवाली' या हिट गाण्यानंतर आता प्रशांत नाकती यांचं 'बाप्पा नादखुळा' (Bappa Nadkhula) हे गणपती स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अनेक हिट आणि ट्रेंडिंग गाण्यानंतर आता प्रशांत नाकती यांचं आणखी एक नवं कोर गाणं साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
चिमुलकलीच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं कोणतीही AI Technology न वापरता सर्वांची लाडकी गायिका सोनाली सोनावणे हिने तिच्या खऱ्या खुऱ्या आवाजात गायलं आहे. सोनालीने आजवर अनेक हिट गाण्यांना आवाज दिला आहे. यांत भर घालत तिचा हा आगळावेगळा प्रयत्न साऱ्यांना मोहून टाकणारा आहे.
सोनाली सोनावणे आणि रोहित राऊतच्या आवाजात गाणं संगीतबद्ध
प्रशांत नाकती यांच्या 'बाप्पा नादखुळा' या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधव याने पेलवली असून या गाण्यात विशाल फाले, निक शिंदे, तश्वी भोईर या कलाकारांना पाहणं रंजक ठरत आहे. तर सोनालीला या गाण्यासाठी रोहित राऊतची उत्तम साथ लाभलेली पाहायला मिळतेय. 'बाप्पा नादखुळा' हे गाणं प्रशांत नाकती यांच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या गाण्याच्या अनुभवाबाबत बोलताना सोनाली असं म्हणाली की, "माझ्या वेगळ्याच आवाजात 'बाप्पा नादखुळा' हे गाणे रेकॉर्ड झालं. लहान मुलीच्या आवाजात गाण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. कधी तरी लहान मुलांच्या आवाजात सहज गाताना प्रशांत दादाने माझा आवाज ऐकला आणि माझ्याकडून गाण्याचे स्क्रॅच गाऊन घेतले. तोच ऑडिओ ऐकून सर्व कलाकार आणि टीमने माझ्याच आवाजात गाणे रेकॉर्ड करायचं ठरवलं. गाणे गाण्यासाठी मी सुरुवातीला अजिबात तयार नव्हते पण सर्व टीमने आग्रह केला आणि प्रशांत दादाने माझा आत्मविश्वास वाढवला. प्रशांत दादाने मला दिलेली ही खूप मोठी संधी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही".
View this post on Instagram