Sonakshi Sinha Speaks Up on Hera Pheri 3: परेश रावल यांच्याशिवाय Hera Pheri 3? सोनाक्षी सिन्हा म्हणतेय, 'मी विचारही करू शकत नाही...'
Sonakshi Sinha Speaks Up on Hera Pheri 3: 'हेरा फेरी' फ्रँचायझीमध्ये बाबूराव गणपतराव आपटे यांची भूमिका साकारून परेश रावल यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सोनाक्षी सिन्हा म्हणते की, परेश रावल यांच्याशिवाय हा विनोदी चित्रपट अपूर्ण आहे.

Sonakshi Sinha Speaks Up on Hera Pheri 3: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या आपली अपकमिंग फिल्म 'निकिता रॉय'मुळे (Nikita Roy) चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीनं मोस्ट अवेटेड फिल्म 'हेरा फेरी 3'मधून (Hera Pheri 3) परेश रावल (Paresh Rawal) यांच्या एग्झिटबाबत भाष्य केलं आहे. अभिनेता परेश रावल यांच्याशिवाय आगामी चित्रपटात अजिबात मजा नाही, असं सोनाक्षी सिन्हाचं म्हणणं आहे. 'बाबुराव गणपतराव आपटे'शिवाय ती चित्रपटाचा विचारही करू शकत नाही, असंही सोनाक्षी सिन्हा म्हणाली.
'हेरा फेरी' फ्रँचायझीमध्ये बाबूराव गणपतराव आपटे यांची भूमिका साकारून परेश रावल यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सोनाक्षी सिन्हा म्हणते की, परेश रावल यांच्याशिवाय हा विनोदी चित्रपट अपूर्ण आहे. वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, "परेश रावलशिवाय मी 'हेरा फेरी 3'ची कल्पनाही करू शकत नाही. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचा जीव आहे."
सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा
अलिकडेच, परेश रावल यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की, ते 'हेरा फेरी 3'चा भाग राहणार नाहीत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, 'हेरा फेरी 3' सोडण्याचा त्यांचा निर्णय क्रिएटिव्ह डिफ्रेंसमुळे नव्हता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशीही त्यांचे कोणतेही मतभेद नाहीत, असंही परेश रावल यांनी स्पष्ट केलं होतं.
सोनाक्षीनं आणि परेश रावल 'निकिता रॉय'मध्ये स्क्रिन शेअर करणार
सोनाक्षी सिन्हानंही तिच्या 'निकिता रॉय' या चित्रपटात पहिल्यांदाच परेश रावल सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, "परेश रावल यांच्या सारख्या प्रतिभावान अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. त्यांचं काम आणि त्यांच्या अभिनयाची खोली पाहून मी खूप प्रभावित झाले."
जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तिला परेश रावल विनोदी भूमिकांमध्ये जास्त आवडतात की, गंभीर भूमिकांमध्ये, तेव्हा सोनाक्षी म्हणाली, "ते विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, प्रत्येक भूमिकेत चमत्कार करतात. त्याच्यासाठी एक निवडणं कठीण आहे."
View this post on Instagram
'निकिता रॉय' कधी रिलीज होणार?
सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा 'निकिता रॉय'मध्ये ती परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुहेल नायर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तिचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























