Swaranjali Shinde : आधी आदर्श-उत्कर्षचा गाजावाजा, आता शिंदेंची लेक दाखवणार ‘शिंदेशाही बाणा’!
Swaranjali Shinde : आजवर अनेक हिट गाणी दिलेल्या शिंदे घराण्यातील स्वरांजली शिंदे "सांग रे मना..." या गाण्याद्वारे म्युझिक व्हिडीओतून संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे.
![Swaranjali Shinde : आधी आदर्श-उत्कर्षचा गाजावाजा, आता शिंदेंची लेक दाखवणार ‘शिंदेशाही बाणा’! Singer Milind Shinde’s daughter Swaranjali Shinde music debut with Sang Re Mana Album Swaranjali Shinde : आधी आदर्श-उत्कर्षचा गाजावाजा, आता शिंदेंची लेक दाखवणार ‘शिंदेशाही बाणा’!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/be46995f3757985509b0bfecc35a24ea_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Swaranjali Shinde : 'ना सांगता ना बोलता छंद लागला तुझा, समजना उमजना सावरू कसा मना' अशी मनोवस्था व्यक्त करणारा "सांग रे मना...." हा नवाकोरा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे, आजवर अनेक हिट गाणी दिलेल्या शिंदे घराण्यातील स्वरांजली शिंदे (Swaranjali Shinde) "सांग रे मना..." या गाण्याद्वारे म्युझिक व्हिडीओतून संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांची ती कन्या आहे.
शिंदे घराण्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. या घराण्यातली स्वरांजली ही पहिली गायिका आहे, त्यामुळेच ‘सांग रे मना’ या म्युझिक व्हिडीओचं वेगळं महत्त्व आहे.
पाहा गाणे :
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची प्रस्तुती असलेल्या ‘सांग रे मना’ या म्युझिक व्हिडीओची निर्मिती एसआरवाय प्रॉडक्शनने केली आहे. रुपेश खांदर या नव्या दमाच्या संगीतकारानं या गाण्याला संगीत दिलं आहे. तसंच, स्वरांजलीसह त्यांनी गाणं गायलंही आहे. तर, सुहास रुके आणि माऊली कोळी या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहेत. सप्तसूर म्युझिकने आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या कलाकारांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. त्यात आता ‘सांग रे मना’ या म्युझिक व्हिडीओचीही भर पडली आहे.
प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्या भावना ‘सांग रे मना’ या गाण्यात मांडण्यात आल्या आहेत. तसंच, उत्तम चित्रीकरण, उत्तम कलाकारही यात असल्यानं म्युझिक व्हिडीओही जमून आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेमिकाची ‘सांग रे मना’ ही भावना आता सुरेल आणि देखण्या पद्धतीनं चित्रीत झाली आहे. सहजसोपे शब्द आणि तितकंच श्रवणीय संगीत असल्यानं हे गाणं तमाम तरुणांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.
हेही वाचा :
- Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये हळहळ, रणवीर सिंहपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
- Sarika : कमल हसनसोबत घटस्फोट अन् मुलीनं सोडली साथ; अभिनेत्री सारिकाचं खडतर आयुष्य
- Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)